Home ब्रेकिंग न्यूज Mumbai News: समुद्रात जाणाऱ्या सर्व नाल्यांवर ट्रॅश बूम बसवण्याची अमित साटम यांची मागणी; महापौर आणि आयुक्तांना पत्र

Mumbai News: समुद्रात जाणाऱ्या सर्व नाल्यांवर ट्रॅश बूम बसवण्याची अमित साटम यांची मागणी; महापौर आणि आयुक्तांना पत्र

0
Mumbai News: समुद्रात जाणाऱ्या सर्व नाल्यांवर ट्रॅश बूम बसवण्याची अमित साटम यांची मागणी; महापौर आणि आयुक्तांना पत्र

मुंबई : मुंबईतील (Mumbai) समुद्रकिनाऱ्यांवर पावसाळ्यात वाहून येणारा कचरा रोखण्यासाठी समुद्रात मिळणाऱ्या सर्व नाले आणि नद्यांच्या मुखाशी ट्रॅश बूम बसवण्याची मागणी मुंबई भाजप अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र पाठवले आहे.

https://prahaar.in/2026/07/12/mumbai-pune-rail-service-disrupted-st-buses-step-in-to-help-passengers-additional-shivneri-buses-introduced/

पत्रात साटम यांनी नमूद केले आहे की, पावसाळ्यात नाले आणि नद्यांमधून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक तसेच इतर घनकचरा समुद्रात वाहून जातो. भरती-ओहोटीच्या वेळी हाच कचरा पुन्हा समुद्रकिनाऱ्यांवर येत असल्याने किनारे अस्वच्छ होतात आणि पर्यावरणावरही विपरीत परिणाम होतो.

सध्या काही ठिकाणी ट्रॅश बूमची व्यवस्था असली तरी ती अपुरी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे समुद्रात मिळणाऱ्या प्रत्येक नाल्याच्या आणि नदीच्या मुखाशी ट्रॅश बूम उभारण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

याशिवाय, ट्रॅश बूममध्ये अडकलेला कचरा नियमितपणे हटवण्यासाठी वर्षभर २४ तास कार्यरत राहील अशी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचीही त्यांनी सूचना केली आहे.

https://prahaar.in/2026/07/12/vidyavihar-flyover-to-open-next-month/

पर्यावरण संरक्षण, समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता (Beach Cleaning) आणि प्रभावी घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने हा प्रस्ताव महत्त्वाचा असल्याचे सांगत, महापालिकेने त्याला प्राधान्य देऊन तातडीने अंमलबजावणी करावी, अशी विनंती अमित साटम यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here