Home साप्ताहिक किलबिल समुद्रात बेटे कशी तयार झाली?

समुद्रात बेटे कशी तयार झाली?

0
समुद्रात बेटे कशी तयार झाली?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील

 

मंदिरात शिवम मित्र गटाच्या ज्ञान विज्ञानाच्या गोष्टी खूपच वाढत होत्या.

“मग समुद्रात बेटे कशी तयार झालीत?” कपिलने विचारले. शिवम म्हणाला, “चारी बाजूंनी पाण्याने वेढलेल्या भूभागाला बेट म्हणतात. पृथ्वी गोठतांना काही ठिकाणी खंडली. त्या खंडित भागांची बेटे तयार झाली. कोठे समुद्रात ज्वालामुखीचा पर्वत गोठून त्याच्या शिखराचे बेट झाले. कोठे नदीच्या मुखाशी गाळ साचतो. तो कडक बनून त्याचे बेट बनते. समुद्रात प्रवाळ साचुनी त्याचे प्रवाळ खडक होतात. त्या प्रवाळ खडकांपासूनही बेट बनते. समुद्रामध्ये काही कि.मी. उंचीचे पर्वतही असतात. त्या पर्वतांचे पायथे सागरतळाशी असतात. जे पर्वत समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाच्याही वर उंच असतात त्यांपासूनच समुद्रातील बेटे तयार होतात. अशाप्रकारे समुद्रात भरपूर बेटे तयार झालीत.”प्रवाळ बेट म्हणजे काय? ते समुद्रात कसे तयार होते?” मंगलने प्रश्न केले. “काही ठिकाणच्या समुद्रात प्रवाळ नावाचे कीटक असतात. त्यांच्या अवशेषांपासून समुद्रात प्रवाळ साचून त्याचे प्रवाळ खडक होतात. प्रवाळ साचत साचत हे प्रवाळ खडक मोठे मोठे होत जातात व ते जेव्हा पाण्याच्या बाहेर येतात तेव्हा त्यांचे प्रवाळ बेट बनते.” शिवमने सांगितले.“समुद्राच्या पोटात पर्वत असतात का?” कैवल्यने विचारले.“होय.” शिवम म्हणाला, “समुद्राच्या पोटात पर्वत असतात. समुद्रतळाच्या सपाटीपासून ज्यांची उंची १ किलोमीटर असते त्याला पर्वत किंवा डोंगर म्हणतात. समुद्राच्या तळाशी जे स्फोट होतात त्यामुळे असे डोंगर तयार होतात.”“समुद्रात वनस्पती असतात का?” यात्रेकरूने शंका विचारली.“हो. समुद्रात वनस्पती असतात. समुद्रात उगवणा­ऱ्या वनस्पतींना किंवा झाडा-झुडपांना सागरी वनस्पती असे म्हणतात. समुद्राचा भूस्तर म्हणजे तळ हा कमी-जास्त खोलीचा असतो. त्या तळातही विविध वनस्पती, झाडे-झुडपे उगवतात.” शिवमने उत्तर दिले. “समुद्रावर लाटा कशा तयार होतात?” कौशल म्हणाला.“समुद्रावर वाहणा­ऱ्या वा­ऱ्याने सागरी पाण्यावर सतत अनेक तरंग उठत असतात. हे तरंग वा­ऱ्याने नेहमी पुढे पुढे जातात. त्या तरंगातरंगांच्याच लाटा बनतात. आपणास जरी लाटांमध्ये पाणी पुढे जातांना दिसते पण वास्तवात ह्या तरंगलहरींतून पाणी वाहत नसते. तर तेथे फक्त जलबिंदूंची खालीवर, मागेपुढे अशी हालचाल होत असते. मात्र वा­ऱ्याचा जोर जास्त असला, तर लाटा खूप मोठमोठ्या उठतात. वा­ऱ्याचा वेग जास्त असला तर लाटाही खूप वेगाने वाहतात.

समुद्राच्या तळाशी होणा­ऱ्या हालचालींमुळे कधी कधी समुद्रावर महाकाय लाटा निर्माण होतात, तर कधी कधी अतिशय वेगवान वादळांमुळेही अशा महाकाय लाटा उत्पन्न होतात. त्यांनाच त्सुनामी म्हणतात. अशा लाटांमधून मात्र सागरावरच्या पाण्याचे वहन होते. अशा महाकाय लाटा जेव्हा किना­ऱ्यावर येऊन आदळतात तेव्हा खूप नुकसान करतात, खूप हाहाकार माजतो. शिवम बोलला.“नद्यांवर, तलावांवर लाटा का निर्माण होत नाहीत?” यात्रेकरूने विचारले.शिवम म्हणाला, लाटा निर्माण होण्यासाठी जसा वारा कारणीभूत असतो तशाच त्यांसाठी पाण्याचा पृष्ठभाग हा आकाराने खूप मोठा विस्तारीत पाहिजे असतो. नदी व तलावाचा पृष्ठभाग हा मर्यादित असतो. त्यामुळे त्यांवर लाटा निर्माण होत नाहीत; परंतु हळूहळू वाहणा­ऱ्या वा­ऱ्यामुळे त्या वा­ऱ्याच्या आवेगानुसार छोट्या छोट्या लहरी मात्र निर्माण होतच असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here