मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा अंतिम सामना ११ जुलै रोजी साउथहॅम्प्टन येथे खेळला जाईल. इंग्लंडने या मालिकेत आधीच तीन सामने जिंकले आहेत. या महत्त्वपूर्ण सामन्यात इंग्लंडचा दिग्गज खेळाडू जॉस बटलर धोनीचा विक्रम मोडण्याच्या जवळआला आहे.इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत तीन सामने गमावल्याने आयसीसी टी-२० क्रमवारीत भारताचे अव्वल स्थान धोक्यात आले आहे. या सामन्यात जोस बटलरला दोन मोठे विक्रम मोडण्याची संधी आहे. (Jos Buttler)
https://prahaar.in/2026/07/11/wimbledon-shubman-gill-spotted-in-wimbledons-royal-box-photo-with-sachin-and-anjali-tendulkar-goes-viral/
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० सामने
जर जॉस बटलर पाचव्या आणि अंतिम सामन्यात खेळला, तर तो रोहित आणि जॉर्ज डॉकरेल यांना मागे टाकून सर्वाधिक टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा दुसरा खेळाडू बनेल. या तिघांनीही आतापर्यंत १५९ सामने खेळले आहेत. पॉल स्टर्लिंगने १६३ सामन्यांसह सर्वाधिक टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम केला आहे.
https://prahaar.in/2026/07/11/nashik-to-host-state-level-competition-after-14-years/
टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक सामने खेळणार खेळाडू
- पॉल स्टर्लिंग (आयर्लंड) – १६३
- जॉस बटलर (इंग्लंड) – १५९
- रोहित शर्मा (भारत) – १५९
- जॉर्ज डॉकरेल (आयर्लंड) – १५९
- मोहम्मद नबी (अफगाणिस्तान) – १५२
https://prahaar.in/2026/07/11/stop-the-business-of-spreading-rumors-navnath-ban-lashes-out-at-sanjay-raut-over-remarks-regarding-the-presidential-system/
सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम
या सामन्यात जर बटलरने एक षटकार मारला तर तो टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये विकेटकीपर-फलंदाज म्हणून सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनेल.सध्या तो धोनी सोबत संयुक्तपणे अव्वल सथानावर आहे. त्याने आतापर्यंत टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ३५९ षटकार मारले आहे.(Ind vs Eng )
- जॉस बटलर (इंग्लंड) – ३५९
- एमएस धोनी (भारत) – ३५९
- क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) – ३००
- ऍडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया) – २५९
- ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंड) – २०८