Home ब्रेकिंग न्यूज Navnath Ban : ‘अफवा पसरवण्याचे उद्योग बंद करा’; राष्ट्राध्यक्ष पद्धतीच्या वक्तव्यावरून नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

Navnath Ban : ‘अफवा पसरवण्याचे उद्योग बंद करा’; राष्ट्राध्यक्ष पद्धतीच्या वक्तव्यावरून नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

0
Navnath Ban : ‘अफवा पसरवण्याचे उद्योग बंद करा’; राष्ट्राध्यक्ष पद्धतीच्या वक्तव्यावरून नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
Navnath Ban

मुंबई : देशात राष्ट्राध्यक्ष पद्धत लागू होणार असल्याबाबत करण्यात येणारे दावे म्हणजे केवळ अफवा असून अशा निराधार चर्चा पसरवणे थांबवावे, असा जोरदार पलटवार भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर केला आहे.

नवनाथ बन (Navnath Ban) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रतिक्रिया देताना, “भारताचे पंतप्रधान हेच देशातील सर्वोच्च लोकशाही पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील जनतेने सलग तीन वेळा जनादेश दिला आहे आणि २०२९ मध्येही तेच पुन्हा पंतप्रधान होतील. देशाच्या संविधानात कोणताही बदल होणार नाही आणि भारतात राष्ट्राध्यक्ष पद्धत लागू होणार नाही,” असे स्पष्ट केले.

ते (Navnath Ban) म्हणाले की, “‘एक देश, एक निवडणूक’ हा केवळ भाजपाचा नाही, तर देशातील १४० कोटी जनतेच्या हिताचा विषय आहे. संविधान बदलण्याबाबत विरोधकांकडून वारंवार खोटा प्रचार केला जात असून, संविधानाचे संरक्षण करण्याची भूमिका भाजपने सातत्याने घेतली आहे.”

https://prahaar.in/2026/07/11/wedding-bells-to-ring-again-in-the-pawar-family-parth-pawar-set-to-tie-the-knot-soon/

नवनाथ बन (Navnath Ban) यांनी काँग्रेसवरही टीका करताना, “संविधानाची भाषा करणाऱ्यांनी इतिहास विसरू नये. संविधानाबाबत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सुरू झाला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संविधानाच्या चौकटीत राहूनच विकासाचे काम सुरू आहे,” असे म्हटले.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांच्या कामाचे कौतुक केल्याबद्दल त्यांनी संजय राऊत यांचे आभार मानले. मात्र, महाविकास आघाडीच्या काळात जनतेची कामे करणारा एकही मंत्री दिसला नाही, असा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य करताना बन म्हणाले, “भाजपमध्ये घराणेशाही नाही. हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय पक्षाचे केंद्रीय आणि राज्य नेतृत्व घेते. २०२९ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहतील.”

https://prahaar.in/2026/07/11/india-is-not-just-a-market-but-a-launchpad-for-global-development-pm-modi/

यावेळी त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर वैयक्तिक टीकाही केली. “भाजपचे निर्णय काय असतील याची भविष्यवाणी करण्यापेक्षा आपल्या पक्षात काय सुरू आहे, याकडे त्यांनी लक्ष द्यावे. भाजप स्वतंत्र विचारांनी चालणारा पक्ष आहे, इतरांच्या सांगण्यावरून निर्णय घेणारा नाही,” असे म्हणत नवनाथ बन (Navnath Ban) यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here