Home ब्रेकिंग न्यूज Kasara Ghat : कसारा घाटात पावसाचा कहर! संरक्षण भिंत कोसळली, महामार्गाला तडे; वाहतूक एकेरी

Kasara Ghat : कसारा घाटात पावसाचा कहर! संरक्षण भिंत कोसळली, महामार्गाला तडे; वाहतूक एकेरी

0
Kasara Ghat : कसारा घाटात पावसाचा कहर! संरक्षण भिंत कोसळली, महामार्गाला तडे; वाहतूक एकेरी

शहापूर : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका शहापूर तालुक्यातील जुन्या कसारा घाटाला (Kasara Ghat) बसला आहे. सततच्या पावसामुळे रस्त्याखालचा भराव वाहून गेल्याने संरक्षण भिंत कोसळली असून महामार्गाच्या काही भागाला भेगा पडल्याचे समोर आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक एकेरी केली आहे. (Kasara Ghat)

जुन्या कसारा घाटातील रस्त्याखालील माती पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने रस्त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे घाटातील संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला असून महामार्गावर तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. (Kasara Ghat)

https://prahaar.in/2026/07/11/up-firozabad-crime-enraged-over-mothers-refusal-to-marry-18-month-old-toddler-brutally-murdered-accused-sentenced-to-death-in-just-40-days/

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने घटनास्थळी उपाययोजना सुरू केल्या आहेत. धोकादायक भागात बॅरिकेड्स उभारण्यात आले असून सध्या या मार्गावर नियंत्रित पद्धतीने एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. दरम्यान, पावसाचा जोर पुन्हा वाढल्यास महामार्गाचा आणखी काही भाग खचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. (Kasara Ghat)

https://prahaar.in/2026/07/11/crime-news-famous-pandya-store-tv-actor-arrested-for-harassing-a-minor-girl/

कसारा घाटातून प्रवास करणाऱ्या यात्रेकरू आणि वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी, तसेच शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Kasara Ghat)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here