Home ब्रेकिंग न्यूज Plane Incident : मृत्यू दारात उभा होता, पत्नीने पाय पकडले अन्… जर्मनी विमानातील थरारक घटना

Plane Incident : मृत्यू दारात उभा होता, पत्नीने पाय पकडले अन्… जर्मनी विमानातील थरारक घटना

0
Plane Incident : मृत्यू दारात उभा होता, पत्नीने पाय पकडले अन्… जर्मनी विमानातील थरारक घटना
Plane Window

अथेन्स : ग्रीसमधून (Greece) जर्मनीकडे (Germany) जाणाऱ्या रायनएअर (Ryanair) या प्रवासी विमानात (Passenger Plane) ३० हजार फूट उंचीवर अत्यंत धक्कादायक घटना घडली. उड्डाणादरम्यान (Flight) विमानाची खिडकी (Window) अचानक फुटल्याने केबिनमधील (Cabin) हवेचा दाब (Air Pressure) झपाट्याने कमी झाला. या घटनेत खिडकीजवळ बसलेल्या ६१ वर्षीय प्रवाशाचे डोके आणि खांदे बाहेरच्या दिशेने ओढले गेले. मात्र पत्नीच्या प्रसंगावधानामुळे आणि सीट बेल्ट (Seat Belt) लावलेला असल्याने त्याचा जीव थोडक्यात बचावला.

ही घटना ग्रीसमधील थेसालोनिकी (Thessaloniki) येथून जर्मनीतील मेमिंगेन (Memmingen) येथे जाणाऱ्या रायनएअरच्या विमानात घडली. त्यावेळी विमान उत्तर मॅसिडोनियाच्या (North Macedonia) हवाई हद्दीत (Airspace) सुमारे ३० हजार फूट उंचीवर उड्डाण करत होते.

पत्नीच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

घटनेच्या वेळी बहुतांश प्रवासी झोपेत होते. अचानक मोठा स्फोट (Blast) झाल्यासारखा आवाज झाला आणि काही क्षणांतच केबिनमधील हवेचा दाब कमी झाला. खिडकीजवळ बसलेला ६१ वर्षीय प्रवासी अचानक बाहेरच्या दिशेने खेचला गेला. त्याचे डोके आणि खांदे खिडकीबाहेर गेले.

https://prahaar.in/2026/07/11/mumbai-best-bus-driver-stopping-the-bus-in-the-middle-of-the-road-to-indulge-in-shevpuri-proves-costly-administration-takes-action-following-the-drivers-viral-video/

त्याच्या शेजारी बसलेल्या पत्नीने क्षणाचाही विलंब न करता त्याचे दोन्ही पाय घट्ट पकडले. त्यानंतर इतर प्रवाशांनी तातडीने मदत करत त्याला पुन्हा विमानाच्या आत ओढले. संबंधित प्रवाशाने सीट बेल्ट (Seat Belt) लावला असल्याने तो पूर्णपणे विमानाबाहेर फेकला गेला नाही आणि त्यामुळे त्याचा जीव वाचला.

ऑक्सिजन मास्क खाली आले, प्रवाशांमध्ये घबराट

या घटनेनंतर विमानातील ऑक्सिजन मास्क (Oxygen Mask) आपोआप खाली आले. केबिनमध्ये तीव्र वास पसरल्याने आणि प्रवाशांच्या किंचाळ्यांमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

विमानातील एका महिला प्रवाशाने स्थानिक रेडिओशी (Local Radio) बोलताना सांगितले की, सुरुवातीला आपत्कालीन दरवाजा (Emergency Exit) उघडला असावा, असे वाटले. मात्र काही क्षणांतच विमानाची खिडकी फुटल्याचे आणि एका प्रवाशाचे डोके बाहेर ओढले गेल्याचे दिसताच सर्वांनाच मोठा धक्का बसला.

सुदैवाने, पत्नीचे प्रसंगावधान, इतर प्रवाशांची तत्पर मदत आणि सीट बेल्ट (Seat Belt) लावलेला असल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here