Home ब्रेकिंग न्यूज Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीचा भक्तिमय सोहळा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे पूजन

Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीचा भक्तिमय सोहळा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे पूजन

0
Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीचा भक्तिमय सोहळा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे पूजन
CM Sant Dnyaneshwar Palkhi

पुणे : आषाढी वारी (Ashadhi Wari) सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिर (Temple) येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन (Darshan) घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते पालखीचे पूजन (Worship) करण्यात आले.

मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार (Felicitation) करण्यात आला. यावेळी त्यांनी आषाढी वारी निमित्त पालखीसोबत पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांना (Warkaris) शुभेच्छा देत त्यांच्या प्रवासासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

https://prahaar.in/2026/07/10/chief-minister-devendra-fadnavis-announces-a-blanket-loan-waiver-for-farmers-who-were-beneficiaries-in-2019-labels-those-objecting-to-the-term-bhade-ke-tattu-hired-hacks-as-suparibaaz-cont/

या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजुषा नागपुरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतिनाथ, राजेंद्र उमाप, भावार्थ देखणे तसेच पालखी विठ्ठल मंदिर संस्थेचे विश्वस्त (Trustees) उपस्थित होते.

मंदिर परिसरात मोठ्या संख्येने वारकरी (Warkaris) आणि भाविक (Devotees) उपस्थित होते. गुरुवारी विठ्ठल नामाच्या गजरासह ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या (Cymbals and Mridanga) तालावर भक्तिमय वातावरणात (Devotional Atmosphere) संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पालखी विठ्ठल मंदिरात आगमन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here