Home ब्रेकिंग न्यूज BEST Bus Accident : मुंबईत बेस्ट बसचा अपघात, बसची १४ वाहनांना धडक; अनेक जखमी

BEST Bus Accident : मुंबईत बेस्ट बसचा अपघात, बसची १४ वाहनांना धडक; अनेक जखमी

0
BEST Bus Accident  : मुंबईत बेस्ट बसचा अपघात, बसची १४ वाहनांना धडक; अनेक जखमी

मुंबई : मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात शुक्रवारी बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. ब्रेक निकामी झाल्याने बसवरील नियंत्रण सुटून बसने सुमारे १४ वाहनांना धडक दिली. या अपघातात ६ ते ८ जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(Mumbai)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

https://prahaar.in/2026/07/10/reverse-migration-is-set-to-begin-soon-in-sindhudurg-district/

दरम्यान, अंधेरी पश्चिम येथील एस. व्ही. रोडवरील अंधेरी सबवे परिसरात दुपारी बेस्टच्या मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट या (कंत्राटी) बसचा भीषण अपघात झाला. भरधाव बसवरील नियंत्रण सुटल्याने तिने रस्त्यावरील १४ वाहनांना धडक दिली. या अपघातात सुमारे ६ ते ८ जण जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी दुपारी ४.१५ वाजता घडला. सांताक्रुज आगाराची बस क्रमांक २४२ ही बस मिल्लत नगर ते अंधेरी बस स्थानक (पश्चिम) या मार्गावर धावत होती. एस. व्ही. रोडकडे उजवे वळण घेत असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि तिने सलग अनेक वाहनांना धडक दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

https://prahaar.in/2026/07/10/monsoon-session-monsoon-session-concludes/

अपघातानंतर बस घटनास्थळावरून टोईंग करून अंधेरी पश्चिम बस स्थानकात नेण्यात आली. बसचालक साहिल सूर्यकांत सावंत (३०) आणि वाहक किरण अप्पा चव्हाण (३५) यांना चौकशीसाठी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. अपघातात ९ रिक्षा, ४ खासगी कार आणि एका तीनचाकी टेम्पोचे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बेस्टचे वरिष्ठ अधिकारी, परिवहन अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी, डेपो व्यवस्थापक तसेच मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस आणि बेस्ट प्रशासनाकडून पुढील तपास सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.(Accident)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here