ब्रिस्टल: इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर वैभवने केलेली कृती आणि त्याची निराशेने भरलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मालिकेत भारतासाठी ही त्याची तिसरी कमी धावसंख्या ठरली असून, त्याच्या फलंदाजीतील संघर्षाने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
https://prahaar.in/2026/07/10/ind-vs-eng-iyers-virat-record-yet-india-once-again-bows-down-before-england/
झेल पूर्ण होण्याआधीच मैदानाबाहेर
🚨 VAIBHAV SOORYAVANSHI GONE
ITS ARCHER AGAIN…..
INDIA ARE NOW 23 / 1 AGAINST ENGLAND pic.twitter.com/U7pUbIfc7b
— U M A R (@Maaalik9) July 9, 2026
जोफ्रा आर्चरने वैभव सूर्यवंशीला १० चेंडूंमध्ये १५ धावांवर बाद केले. या मालिकेत सलग दुसऱ्यांदा आर्चरने वैभवला शॉर्ट बॉल्सच्या जाळ्यात अडकवले. पुल शॉट मारताना टायमिंग चुकल्याने वैभवचा सोपा झेल मिड-ऑनला गेला. विशेष म्हणजे, झेल पूर्ण होण्याची वाट न पाहताच वैभव मैदानाबाहेर चालू लागला. त्याच्या चेहऱ्यावरील हताश भाव आणि आकाशाकडे पाहत त्याने व्यक्त केलेली निराशा त्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
https://prahaar.in/2026/07/10/fifa-world-cup-2026-kylian-mbappes-brilliance-france-storms-into-the-historic-semi-finals-by-defeating-morocco-2-0/
टीम इंडियात महत्त्वाचे बदल
पाच सामन्यांच्या मालिकेत ०-२ ने पिछाडीवर असलेला भारतीय संघ आज कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पहिल्या विजयाच्या शोधात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या अय्यरने संघात दोन महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत.
-
बदल: दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांना संघातून वगळण्यात आले आहे.
-
समावेश: त्यांच्या जागी प्रसिद्ध कृष्णा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे.
https://prahaar.in/2026/07/10/eng-vs-ind-englands-resounding-9-wicket-victory-over-india-clinch-the-series-by-winning-the-fourth-t20/
‘नव्या सुरुवातीची गरज’ – श्रेयस अय्यर
नाणेफेकीदरम्यान बोलताना कर्णधार श्रेयस अय्यरने सकारात्मकतेवर भर दिला. तो म्हणाला, “पहिल्या दोन सामन्यांत आम्ही आमचा निर्भय खेळ दाखवला आहे, परंतु योजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. आजचा दिवस नवीन आहे. खेळपट्टीवर गवत आहे, त्यामुळे परिस्थितीनुसार जुळवून घेणे महत्त्वाचे ठरेल. आम्ही सकारात्मक मानसिकतेने मैदानात उतरत आहोत आणि विजयासाठी प्रयत्नशील आहोत.”
भारतीय संघ सध्या दबावाखाली असला तरी, श्रेयस अय्यरने स्वतः जबाबदारी स्वीकारत डाव सावरला आणि आपल्या कामगिरीने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला आहे.