Home ताज्या घडामोडी Lote MIDC : लोटे एमआयडीसीतील रसायन गळतीने खळबळ, एमपीसीबीकडून सहा कारखान्यांना उत्पादन बंदीची दिली नोटीस

Lote MIDC : लोटे एमआयडीसीतील रसायन गळतीने खळबळ, एमपीसीबीकडून सहा कारखान्यांना उत्पादन बंदीची दिली नोटीस

0
Lote MIDC : लोटे एमआयडीसीतील रसायन गळतीने खळबळ, एमपीसीबीकडून सहा कारखान्यांना उत्पादन बंदीची दिली नोटीस
Lote MIDC

खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, औद्योगिक वसाहतीतील एका चेंबरमधून मोठ्या प्रमाणात रासायनिक गळती झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हे रसायन नैसर्गिक ओढ्याद्वारे शेतजमिनीत आणि पुढे नदीच्या दिशेने वाहून गेल्याचा दावा करण्यात आल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

https://prahaar.in/2026/07/09/clouds-over-the-bay-of-bengal-have-cleared-and-the-intensity-of-rainfall-in-the-state-is-set-to-subside-however-an-orange-alert-has-been-issued-for-the-ghat-areas-of-pune-and-satara/

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून जाब विचारला. याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करत लोटे औद्योगिक वसाहतीतील पोलिस दूरक्षेत्र कार्यालयात लेखी तक्रारही दाखल करण्यात आली. या गंभीर प्रकाराची दखल घेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्राथमिक कारवाई करत सुप्रिया लाइफ सायन्स, स्पॅक कंपनी, विनंती ग्रो, अक्वीला कंपनी, लक्ष्मी ऑरगॅनिक आणि एसएमडी स्पेशालिटी या सहा कारखान्यांना उत्पादनबंदीच्या नोटिसा बजावल्या आहेत. या कारखान्यांमधून प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांची तपासणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

https://prahaar.in/2026/07/09/whatsapp-announces-meta-business-agent-ai-a-new-ai-solution-to-provide-24-7-customer-service-to-businesses/

कांचन चाळके (माजी सैनिक), शीतल जाधव आणि संजना घाग या सोनगावातील महिला ग्रामस्थांनी प्रदूषणामुळे परिसरातील पर्यावरण, शेती आणि नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाल्याचा आरोप करत जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी लोटे औद्योगिक वसाहतीतील पोलिस दूरक्षेत्र कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर केवळ नोटिसा देऊन न थांबता त्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.

https://prahaar.in/2026/07/09/central-railway-major-impact-of-landslide-on-the-lonavala-karjat-railway-route-several-express-trains-including-the-deccan-queen-cancelled-until-july-17/

लोटे एमआयडीसीतील प्रदूषण प्रश्न यापूर्वीही अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी प्रशासनाने बजावलेल्या उत्पादन बंदीच्या नोटीसांची प्रभावी अंमलबजावणी होते का व दोषींवर पुढे कोणती कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here