Gauri Sprat : अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि गौरी स्प्रॅट (Gauri Sprat) यांच्या विवाहसोहळ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. साध्या आणि खासगी पद्धतीने पार पडलेल्या या लग्नात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते आमिरने गौरीसाठी निवडलेल्या खास अंगठीने. या अंगठीचा फोटो सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तिच्या डिझाइनची आणि वैशिष्ट्यांची चर्चा रंगली आहे.
https://prahaar.in/2026/07/09/taarak-mehta-ka-ooltah-chashma/
131 कारागीर, 256 तास, गौरीसाठी खास अंगठी
ही अंगठी तयार करण्यासाठी तब्बल २५६ तासांचा कालावधी लागला असून, १३१ कुशल कारागिरांनी तिची निर्मिती केली आहे. अंगठीत ४० अस्सल हिरे जडवण्यात आले असून तिचा मुख्य आकर्षणबिंदू म्हणजे मादागास्करमधून (Madagascar) आणलेला दुर्मिळ कॅबोशॉन-कट नैसर्गिक माणिक. या अंगठीची रचना अतिशय वेगळी असून, गडद लाल रंगाचा नैसर्गिक माणिक सोन्याच्या मुकुटासारख्या उंचावलेल्या डिझाइनमध्ये बसवण्यात आला आहे. त्याभोवती आकर्षक सोन्याची नक्षी करण्यात आली असून, त्याला ४० हिऱ्यांची देखणी सजावट देण्यात आली आहे.
https://prahaar.in/2026/07/09/nashik-famous-actress-gets-slapped-by-consumer-commission/
२५६ तासांचे बारकाईने काम
माहितीनुसार, या अंगठीसाठी वापरण्यात आलेला दुर्मिळ मादागास्कर रुबी मिळवण्यासाठी तीन महिन्यांहून अधिक काळ लागला. त्यानंतर अंगठीला अंतिम स्वरूप देण्यासाठी २५६ तासांचे बारकाईने काम करण्यात आले. १३१ कारागिरांच्या मेहनतीतून साकारलेली ही अंगठी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
आमिर आणि गौरी यांनी ५ जुलै रोजी वांद्रे येथील आमिरच्या निवासस्थानी कुटुंबीय आणि अतिशय जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत विवाह केला. लग्नसोहळा साधेपणाने पार पडला असला, तरी गौरीच्या बोटातील ही खास अंगठी चर्चेचा विषय ठरली आहे.