Home ब्रेकिंग न्यूज Nasrapur Case : जिलेबीची ऑर्डर नसती तर… ;नसरापूर हत्याकांडातला धक्कादायक खुलासा समोर

Nasrapur Case : जिलेबीची ऑर्डर नसती तर… ;नसरापूर हत्याकांडातला धक्कादायक खुलासा समोर

0
Nasrapur Case : जिलेबीची ऑर्डर नसती तर… ;नसरापूर हत्याकांडातला धक्कादायक खुलासा समोर

पुणे : नसरापूर (Nasrapur) येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात दोषीला अवघ्या दोन महिन्यांत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणातील महत्त्वाच्या पुराव्याबाबत आता पीडित मुलीच्या वडिलांनी मोठा खुलासा केला आहे. एका स्वीट होममधील सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपीविरोधातील तपासाला निर्णायक दिशा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. (Child Murder Case)

https://prahaar.in/2026/07/09/a-grand-memorial-for-the-brave-warrior-jivaji-mahale-will-be-erected-at-the-foothills-of-pratapgad-an-initial-fund-of-%e2%82%b91-crore-has-been-allocated-for-the-first-phase/

पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, घटना घडली त्यावेळी संपूर्ण गावात वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे ग्रामपंचायतीचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. आरोपीनेही याच परिस्थितीचा फायदा घेत गुन्हा केल्याचा संशय आहे.

मात्र, एका स्वीट होमला त्याचवेळी जिलबीची ऑर्डर मिळाल्याने दुकानातील इनव्हर्टर सुरू करण्यात आला. इनव्हर्टर सुरू होताच दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेराही कार्यान्वित झाला आणि त्यामध्ये आरोपी चिमुकलीला सोबत घेऊन जात असल्याचे दृश्य रेकॉर्ड झाले.

https://prahaar.in/2026/07/09/ias-major-decision-by-the-state-government-transfers-of-8-senior-ias-officers-in-the-state/

तपासादरम्यान हेच सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचा पुरावा ठरले. या फुटेजच्या आधारे पीडित मुलगी शेवटची आरोपीसोबत दिसल्याचे स्पष्ट झाले आणि न्यायालयीन प्रक्रियेत या पुराव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, हे सीसीटीव्ही फुटेज मिळाले नसते, तर आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्याचे काम अधिक कठीण झाले असते. तपास यंत्रणा आणि न्यायालयाने जलदगतीने काम करत दोषीला शिक्षा सुनावल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here