Home महाराष्ट्र नाशिक Nashik : गंगापूर धरणाच्या पाणी साठ्यात वाढ; नाशिकवरील पाणी कपात टळणार ?

Nashik : गंगापूर धरणाच्या पाणी साठ्यात वाढ; नाशिकवरील पाणी कपात टळणार ?

0
Nashik : गंगापूर धरणाच्या पाणी साठ्यात वाढ; नाशिकवरील पाणी कपात टळणार ?

Nashik : नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांच्या कधी संततधार तर कधी मुसळधार पावसामुळे नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्याची बुधवारी चांगलीच तारांबळ उडाली. नसिक शहरातील अनेक पूल पाण्याखाली गेले होते , अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. अनेक ठिकाणी रस्ते खचल्याने आणि खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे चांगलेच हाल झाले तसेच ठिकठिकाणी वाहतूक कोंडीही झाली.

दरम्यान , शहरात झालेल्या पावसामुळे नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) वाढ झाली आहे. शहरासह जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात (Dam Water Position) देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे नाशिकवरील पाणीसंकट टळण्याची शक्यता आहे.

https://prahaar.in/2026/07/09/maharashtra-rain-update-state-records-average-rainfall-of-332-mm-since-june-1-raigad-receives-highest-rainfall-of-71-4-mm-in-24-hours/

सध्या गंगापूर धरण ७०.१८ टक्के इतके भरले असून, मागील वर्षी गंगापूर धरण आजच्या दिवशी ५५.२२ टक्के इतके भरले होते. तर धरण समूहातील मागील वर्षीची टक्केवारी ६८.३८ टक्के इतकी होती. यानंतर आज धरण समूहातील पाण्याची टक्केवारी ६४.७७ एवढी आहे. दरम्यान, पावसाळा सुरु होण्याआधी काही तालुक्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा (Water Supply) सुरु होता. तसेच महिलांना दोन किलोमीटरवरून डोक्यावर पाण्याचा हंडा आणावा लागत होता. मात्र, आता पाऊस पडल्यामुळे सध्या तरी काही प्रमाणावर पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

https://prahaar.in/2026/07/09/kuberas-treasure-found-at-former-government-officials-home-22-kg-of-gold-and-silver-%e2%82%b91-62-crore-in-cash-seized/

आजचा धरणसाठा किती ?

भावली -८७.५२ टक्के

कडवा -७८.२६ टक्के

हरणबारी – ७१.४४ टक्के

गंगापूर – ७०.१८ टक्के

दारणा -५२.०८ टक्के

चणकापूर- ४९.५७ टक्के

https://prahaar.in/2026/07/09/jalgaon-amrit-bharat-express-to-run-daily-starting-today/

तालुकानिहाय पाऊस (मिमी)

मालेगाव – ५६.८

बागलाण – १२२.१

कळवण – १७८.५

नांदगाव – ५९.६

सुरगाणा – १५४.२

नाशिक – ११८.८

दिंडोरी – ९१.६

इगतपुरी – ११७.४

पेठ – ११४.९

निफाड – ७५.१

सिन्नर – ८८.६

येवला – ४२.१

चांदवड – ७८.३

त्र्यंबकेश्वर – २९५.६

देवळा – ६९.५

https://prahaar.in/2026/07/09/malegaon-junior-clerk-caught-in-acb-trap/

दरम्यान, नाशिक शहरातील पावसाच्या आगमनाने नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पाणी आणि खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. नासर्डी आणि दादोबा रोडवरील पूल पाण्याखाली गेल्याने प्रशासनाला रस्ते बंद करावे लागले. तसेच शहरात अनेक ठिकाणी सिंहस्थाची कामे सुरू असल्याने ठिकठिकाणी रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांचे चांगलेच हाल झाले.

दुसरीकडे कार्बन नाका परिसरात रस्ता खचल्याने एक ट्रक अडकला. दरम्यान, नांदूर मध्यमेश्वर जवळील बेटावर अडकलेल्या ५ जणांना आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुखरूप बाहेर काढले. दुर्दैवाने, गेल्या दोन दिवसांत पावसामुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमेश्वर धबधबा वाहू लागल्याने गर्दी वाढली आहे. १३ जुलैपर्यंत धबधबे आणि ट्रेकिंग पॉइंट्सवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here