Home ब्रेकिंग न्यूज Ashadhi Wari 2026 : विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी; वारीच्या वाटेवर प्रशासनाने उभारली खास सुविधा

Ashadhi Wari 2026 : विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी; वारीच्या वाटेवर प्रशासनाने उभारली खास सुविधा

0
Ashadhi Wari 2026 : विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी; वारीच्या वाटेवर प्रशासनाने उभारली खास सुविधा
Ashadhi Wari 2026

 Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पुणे जिल्ह्यातून पायी पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहेत. या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाने विविध ठिकाणी विशेष वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अतिदक्षता (ICU) सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. (Ashadhi Wari)

https://prahaar.in/2026/07/09/rainfall-pattern-in-the-state-set-to-change-relief-for-konkan-while-heavy-rain-is-forecast-for-north-maharashtra-vidarbha-and-marathwada/

आपत्कालीन परिस्थितीत वारकरी तसेच इतर रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी या केंद्रात तीन अतिदक्षता खाटा आणि दोन ऑक्सिजनयुक्त खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. उष्माघात, हृदयविकार, श्वसनाचा त्रास, अपघात तसेच इतर गंभीर आजारांवर त्वरित उपचार करता यावेत, यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. (Warkari Health)

आरोग्य केंद्रात 24 तास सेवेसाठी आयसीयू फिजिशियन, भूलतज्ज्ञ आणि फिजिशियन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच गरजेनुसार स्त्रीरोगतज्ज्ञ, प्रसूतीतज्ज्ञ आणि अस्थिरोगतज्ज्ञ यांची सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Pandharpu Wari)

https://prahaar.in/2026/07/09/ias-major-decision-by-the-state-government-transfers-of-8-senior-ias-officers-in-the-state/

वारी मार्गावरील भाविकांना दर्जेदार आणि तातडीची आरोग्य सेवा मिळावी, गंभीर रुग्णांवर वेळेत उपचार करून आवश्यक असल्यास त्यांना पुढील रुग्णालयात सुरक्षितपणे हलवता यावे, यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे. ( Medical Facility for Warkari)

आषाढी वारीच्या संपूर्ण कालावधीत आरोग्य विभागाकडून वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, औषधसाठा, जीवनरक्षक उपकरणे आणि आपत्कालीन उपचारासाठी आवश्यक सर्व व्यवस्था उपलब्ध ठेवण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here