पालघर : वसई-विरार (Vasai- Virar) परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सलग दोन दिवसांच्या पावसानंतर अनेक सखल भाग जलमय झाले असून घरांमध्ये पाणी शिरल्याने हजारो कुटुंबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक भागांमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही वीजपुरवठा खंडित (Power Outage) असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
https://prahaar.in/2026/07/07/major-decision-by-the-state-government-for-flood-affected-alandi/
पूरामुळे घरांमध्ये अन्नधान्य, घरगुती साहित्य आणि इतर वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नालासोपारा आणि वसई-विरारमधील अनेक भागांत दूध, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन गरजांसाठीही संघर्ष करावा लागत आहे.
वसई पश्चिमेतील सनसिटी येथील मुख्य वीज उपकेंद्र पाण्याखाली गेल्याने महावितरणने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक भागांचा वीजपुरवठा बंद केला आहे. याचा फटका सनसिटी, गास, निर्मळ, नालासोपारा आणि विरारमधील नागरिकांना बसला असून अनेक भाग अंधारात आहेत. (Flood News)
https://prahaar.in/2026/07/08/fatal-obsession-with-selfies-three-friends-tragically-drown-in-a-quarry-in-amalner/
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मोबाइल टॉवर्स आणि स्थानिक इंटरनेट सेवांचाही बॅकअप संपला आहे. परिणामी इंटरनेट सेवा ठप्प झाली असून ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कामकाज प्रभावित झाले आहे. संपर्क व्यवस्था खंडित झाल्याने नागरिकांना नातेवाईकांशी संपर्क साधण्यातही अडचणी येत आहेत. (Virar latest News)
दरम्यान, प्रशासनाकडून पूरग्रस्त भागातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून पाणी ओसरल्यानंतर वीजपुरवठा आणि इतर सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.