Kalyan Dombivli rain : कल्याण-डोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत. भिवंडी तालुक्यातील पडघा येथील गणेश नगर परिसरात खांद्याएवढे पाणी साचल्याने एका घरात चार जण अडकून पडले होते. पडघा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्वांना सुखरूप बाहेर काढले. ( Padgha rescue)
https://prahaar.in/2026/07/08/a-thrilling-incident-at-palghars-vandri-waterfall-the-water-flow-surged-in-just-two-minutes/
घरात चार जण अडकल्याची माहिती मिळताच पडघा पोलीस ठाण्याचे (Padgha Police) वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी स्वतः पथकासह घटनास्थळी धाव घेतली. परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे त्यांनी स्वतः पाण्यात उतरून बचावकार्य सुरू केले.
या बचाव मोहिमेत चार वर्षांची देविका पवार, अश्विनी पवार (२५), संतोष पवार (२८) आणि जोशना साळुंखे (६०) यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मुसळधार पावसामुळे घराभोवती पाणी साचल्याने हे कुटुंब बाहेर पडू शकत नव्हते. ( heavy rain Maharashtra)
https://prahaar.in/2026/07/07/ahilyanagar-321-mm-of-rainfall-recorded-at-ghatghar/
पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून संबंधित कुटुंबीयांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी आणि त्यांच्या पथकाचे आभार मानले. त्यांच्या धाडसी बचावकार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, कल्याण-डोंबिवली आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच पूरस्थिती असलेल्या भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.