Home ब्रेकिंग न्यूज Amalner Drowning Incident : सेल्फीचा मोह जीवावर बेतला! अमळनेरमध्ये खदाणीत बुडून तिघा मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

Amalner Drowning Incident : सेल्फीचा मोह जीवावर बेतला! अमळनेरमध्ये खदाणीत बुडून तिघा मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

0
Amalner Drowning Incident : सेल्फीचा मोह जीवावर बेतला! अमळनेरमध्ये खदाणीत बुडून तिघा मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील अमळनेर येथे मंगळवारी सायंकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळील पाण्याच्या खदाणीत बुडून तीन अल्पवयीन मित्रांचा मृत्यू झाला. सेल्फी काढत असताना एका मुलाचा पाय घसरला आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर दोघांनीही आपला जीव गमावला. ( Amalner drowning incident)

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलांची नावे मानव बंटी रतनानी (१४), कार्तिक विकी उधवानी (१४) आणि दिनेश विजय पंजवानी (१७) अशी आहेत. तिघेही सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी असून सायंकाळी फिरण्यासाठी खदाणीजवळ गेले होते. (Jalgaon news)

https://prahaar.in/2026/07/07/missed-out-on-class-11-admission-a-golden-opportunity-for-female-students-special-round-2-announced/

खदाणीतील टेकडीसारख्या उंचवट्यावर पोहोचल्यानंतर तिघे मोबाईलवर सेल्फी काढत होते. त्यावेळी एका मुलाचा पाय घसरून तो खोल पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या मित्राने हात दिला, मात्र तोही पाण्यात ओढला गेला. दोघांना वाचवण्यासाठी तिसऱ्या मित्राने प्रयत्न केला, परंतु तिघांचाही तोल जाऊन ते सुमारे ३० फूट खोल पाण्यात बुडाले. (drowning case)

https://prahaar.in/2026/07/07/major-relief-from-central-railway-following-the-landslide-refunds-worth-%e2%82%b96-crore-issued-to-80000-passengers-a-twofold-increase-compared-to-last-year/

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. देवळी येथील दीपक मोरे यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारून तिन्ही मुलांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. तिन्ही मुलांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here