Nashik : नाशिक शहरात रविवारपासून पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नसली तरी घाटमाथ्यावर अजूनही अतिवृष्टी सुरू आहे. गोदावरी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून अनेक ठिकाणी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा कायम ठेवला आहे. मुसळधार पावसाने आधीच प्रशासनाच्या नाकेनऊ आणले आहे. अशातच काही अतिउत्साही तरुणांनी प्रशासनाच्या सूचनांची पायमल्ली केल्याचं दिसत आहे. (Nashik Rain Update)
https://prahaar.in/2026/07/07/nashik-water-level-of-godavari-also-increased/
हुल्लडबाजांनी थेट पुलावरून उड्या
नाशिकच्या गाडगे महाराज पुलावरून काही हुल्लडबाजांनी थेट खाली उड्या मारल्या आहे. उड्या मारल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यासोबतच रामकुंड येथील दुतोंड्या मारूती जवळच्या पुलावरून देखील एकाने थेट मारली. तर त्याच पुलावरून धोखादायक स्थितीत एक चालत आला ज्या पोलिसांनी चांगलाच चोप दिला. (Nashik Rain Update)
https://prahaar.in/2026/07/07/ahilyanagar-300-mm-of-rain-in-24-hours/
प्रशासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष
नाशिकमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. रविवारपासून नाशिकमध्ये पाऊस सुरु आहे त्यामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून आहेत , असे असतानाच अनेकजण स्वतःचा जीव धोक्यात घालत आहे. क्षणिक आनंदासाठी जीव घालू नका , पाण्यापासून सुरक्षित अंतररावर रहा असे वारंवार प्रशासनाकडून सांगितले जात असतानाही काही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे शहरात पहायला मिळत आहे. (Nashik Rain Update)
https://prahaar.in/2026/07/07/refineries-or-nuclear-power-projects-will-not-come-in-the-way-of-the-rock-carvings/
जिल्ह्यात किती मिलीमीटर पाऊस ?
इगतपुरी – २००
सुरगाणा – १४९
त्र्यंबकेश्वर – १२५
सिन्नर – ७४
पेठ – ६१
दिंडोरी – ५८
पिंपळगाव बसवंत – ५१.५
सटाणा बागलाण – ४७
निफाड – ४५.२
कळवण -४०
देवळा – ४०
येवला – १५