मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे आणि पनवेल येथे सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी ऑरेंज अलर्ट जारी करत मुसळधार पाऊस आणि ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईसह ठाणे आणि पनवेल मधील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा तसेच महाविद्यालयांना सोमवार, ६ जुलै रोजी सुटी जाहीर (School – College Holidays) करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला असून, पावसामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी घराबाहेर पडू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, शासकीय आणि खासगी कार्यालये नेहमीप्रमाणे सुरू राहणार असून, कर्मचाऱ्यांनी नियमितपणे कामावर हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुटी असली तरी कार्यालयीन कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही. (School – College Holidays)
दरम्यान, हवामान विभागाने मुंबईत दिवसभर मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या आणि फांद्या तुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. (School – College Holidays)
https://prahaar.in/2026/07/05/tree-collapse-in-mumbai-mumbai-hit-by-strong-winds-142-incidents-of-trees-or-branches-falling-2-tragic-deaths/
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना “अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे”, समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहावे आणि हवामान विभाग तसेच महापालिकेकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि संबंधित अधिकारी अलर्ट मोडवर असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. मुंबईकरांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (School – College Holidays)
https://prahaar.in/2026/07/05/mumbai-rain-update-heavy-rains-wreak-havoc-across-the-state-including-mumbai-many-areas-waterlogged-and-dam-water-levels-rise/
मंत्री आशिष शेलार यांनी दिल्या महापालिकेला सूचना :
उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे आज संध्याकाळी. मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि पोलीस सह आयुक्त ( वाहतूक) यांच्याशी संवाद साधून पाणी तुंबणारी ठिकाणे, दरड कोसळणाऱ्या जागा, धोकादायक झाडे, शाळा, किनारपट्टी वरील झोपड्या, मिठी नदी परिसरातील रहिवासी याबाबत आपत्कालीन यंत्रणेने केलेल्या उपाययोजनांबाबत मंत्री आशिष शेलार यांनी आढावा घेतला. पावसासोबतच सोसाट्याचा वारा आल्यास महापालिकेचे अग्निशमन दल, आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने मदत कार्य होईल या दृष्टीने सतर्क ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.