Home ताज्या घडामोडी Devendra Fadnavis : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांच्या निधनावर मुख्यमंत्री फडणवीसांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

Devendra Fadnavis : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांच्या निधनावर मुख्यमंत्री फडणवीसांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

0
Devendra Fadnavis : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांच्या निधनावर मुख्यमंत्री फडणवीसांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

नागपूर : विदर्भातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूरावजी तिडके यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या सार्वजनिक जीवनावर शोककळा पसरली असून विविध स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बाबूरावजी तिडके यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, बाबूरावजी तिडके यांनी नागपूर जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देण्याबरोबरच शिक्षण, सहकार आणि समाजकारणाच्या क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे अनेक कार्यकर्त्यांची राजकीय जडणघडण झाली आणि त्यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वातून अनेकांना प्रेरणा मिळाली.

https://prahaar.in/2026/07/05/kurla-news-shocking-63-year-old-man-dies-after-tree-collapses-in-kurla/

मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले की, अलीकडेच बाबूरावजी तिडके यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेण्याचा योग आला होता. त्यांच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे आणि अभ्यासू नेतृत्वामुळे ते अनेकांसाठी प्रेरणास्थान होते.

“बाबूरावजी तिडके यांच्या निधनाने विदर्भाच्या सार्वजनिक जीवनातील एक उमदे, अभ्यासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,” अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

https://prahaar.in/2026/07/05/teejan-bai-teejan-bai-passes-away-the-voice-that-gave-global-recognition-to-the-pandavani-folk-art-form-falls-silent-forever/

बाबूरावजी तिडके यांनी राजकारणासोबतच समाजसेवा, शिक्षण आणि सहकार क्षेत्रात दीर्घकाळ मोलाचे कार्य केले. त्यांच्या निधनामुळे विदर्भातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. (Devendra Fadnavis)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here