Home ब्रेकिंग न्यूज Zenith Waterfall: खोपोलीच्या झेनिथ धबधब्यावर १०० हून अधिक पर्यटक अडकले; ३ तासांच्या बचाव मोहिमेनंतर सर्वांची सुखरूप सुटका

Zenith Waterfall: खोपोलीच्या झेनिथ धबधब्यावर १०० हून अधिक पर्यटक अडकले; ३ तासांच्या बचाव मोहिमेनंतर सर्वांची सुखरूप सुटका

0
Zenith Waterfall: खोपोलीच्या झेनिथ धबधब्यावर १०० हून अधिक पर्यटक अडकले; ३ तासांच्या बचाव मोहिमेनंतर सर्वांची सुखरूप सुटका

रायगड : पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या खोपोलीतील झेनिथ धबधब्यावर (Zenith Waterfall) शनिवारी मोठी दुर्घटना टळली. मुसळधार पावसामुळे अचानक ओढ्याला पूर आल्याने १०० हून अधिक पर्यटक अडकून पडले. सुमारे २ ते ३ तास चाललेल्या बचाव मोहिमेनंतर सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली.

रायगड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तरीही वीकेंड असल्याने अनेक पर्यटक झेनिथ धबधब्यावर फिरण्यासाठी आले होते. धबधब्यात आनंद घेतल्यानंतर परतत असताना अचानक ओढ्याच्या पाण्याची पातळी वेगाने वाढली. जोरदार प्रवाहामुळे पर्यटकांना ओढा ओलांडता आला नाही आणि ते एका बाजूला अडकून पडले. ( Khopoli News)

https://prahaar.in/2026/07/05/rajasthan-crime-news-13-year-old-girl-trafficked-and-gang-raped-administration-demolishes-four-illegal-hotels/

घटनेची माहिती मिळताच विहारी ठाकुरवाडी येथील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोरखंडाच्या सहाय्याने मानव साखळी तयार करून अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सुरुवात केली.

दरम्यान, या घटनेची माहिती खोपोली पोलिसांना आणि खोपोली नगर परिषदेच्या अग्निशमन दलालाही देण्यात आली. माहिती मिळताच बचाव पथके ( Rescue Operation) घटनास्थळी दाखल झाली आणि ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य अधिक वेगाने सुरू करण्यात आले.

दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली ही मोहीम जवळपास ३ तास चालली. अखेर सर्व पर्यटकांची कोणतीही जीवितहानी न होता सुखरूप सुटका करण्यात यश आले.

https://prahaar.in/2026/07/05/vaibhav-suryavanshis-impressive-debut-goes-in-vain-england-beat-india-by-4-wickets/

दरम्यान, प्रशासनाने मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर धबधबे, नद्या आणि ओढ्यांच्या परिसरात जाणे टाळावे, तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पर्यटकांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here