Home ताज्या घडामोडी Aamir Khan Wedding : आमिर खान-गौरी स्प्रॅटचा खासगी विवाहसोहळा; फक्त १०० ते १५० पाहुण्यांना निमंत्रण, ‘ते’ दोन खास मित्र चर्चेत

Aamir Khan Wedding : आमिर खान-गौरी स्प्रॅटचा खासगी विवाहसोहळा; फक्त १०० ते १५० पाहुण्यांना निमंत्रण, ‘ते’ दोन खास मित्र चर्चेत

0
Aamir Khan Wedding : आमिर खान-गौरी स्प्रॅटचा खासगी विवाहसोहळा; फक्त १०० ते १५० पाहुण्यांना निमंत्रण, ‘ते’ दोन खास मित्र चर्चेत
amir khan

मुंबई : बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट'(Mr. Perfectionist) आमिर खान ५ जुलै रोजी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या लग्नाबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. अखेर आमिरने स्वतःच लग्नाची पुष्टी करत हा सोहळा अत्यंत खासगी स्वरूपात होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

‘प्रीतम अँड पेड्रो’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान आमिर खान म्हणाला, “होय, मी ५ जुलै रोजी लग्न करत आहे. हा अत्यंत खासगी विवाहसोहळा असून आम्ही तो घरीच आयोजित केला आहे. या सोहळ्याला दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्रच उपस्थित राहतील. आम्हाला सर्वांचे आशीर्वाद हवेत.”

https://prahaar.in/2026/07/04/relief-for-onion-growers-from-the-central-government/

फक्त मोजक्या पाहुण्यांची उपस्थिती :

मिळालेल्या माहितीनुसार, आमिर आणि गौरी यांनी लग्नासाठी केवळ १०० ते १५० पाहुण्यांनाच निमंत्रण दिले आहे. यात दोन्ही कुटुंबातील सदस्य, जवळचे मित्र आणि बॉलिवूडमधील काही निवडक कलाकारांचा समावेश आहे. हा विवाहसोहळा कोर्ट मॅरेजनंतर घरगुती पद्धतीने साजरा केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हे दोन खास मित्र ठरले चर्चेचा विषय :

या लग्नाच्या तयारीत आमिर खानचे दोन जुने आणि जवळचे मित्र विशेष चर्चेत आहेत. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी लग्नाच्या तयारीत महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या दोघांनी आमिर आणि गौरीला विवाहसोहळ्याच्या नियोजनात मार्गदर्शन केले. लग्नाचा दिवस त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरावा, अशी त्यांची इच्छा असल्याचेही सांगितले जात आहे.

https://prahaar.in/2026/07/04/state-cooperative-union-education-fund-to-be-restarted-chief-minister-devendra-fadnaviss-assurance/

बॉलिवूडमध्ये अनेक भव्य विवाहसोहळे पाहायला मिळाले असले, तरी आमिर आणि गौरी यांनी साधेपणाला प्राधान्य देत खाजगी पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या विवाहाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here