Home ताज्या घडामोडी Flyover accident : छावणी उड्डाणपुलावर बसचा भीषण अपघात ; ३५ प्रवासी जखमी

Flyover accident : छावणी उड्डाणपुलावर बसचा भीषण अपघात ; ३५ प्रवासी जखमी

0
Flyover accident : छावणी उड्डाणपुलावर बसचा भीषण अपघात ;  ३५ प्रवासी जखमी
Flyover accident

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर ते वाळूज मार्गावरील छावणी उड्डाणपुलावर रात्री ११.३० वाजता एका खासगी कंपनीच्या बसचा भीषण अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये एका कंपनीचे ३५ कर्मचारी प्रवास करत होते. दुसऱ्या शिफ्टनंतर कंपनीतील कामगारांना घरी घेऊन जाणारी ही खासगी बस उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या ऊसाने भरलेल्या ट्रॉलीवर जोरात धडकली.या अपघातात बस चालक जाधव यांचा मृत्यू झाला असून जवळपास 35 कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

https://prahaar.in/2026/07/03/five-people-have-died-so-far-in-the-heavy-rains-citizens-safety-is-a-serious-concern/

अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की चालक बसच्या केबिनमध्ये अडकला होता. नागरिकांच्या मदतीने बस चालकाला बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि मदत पथकांनी तत्काळ बचावकार्य सुरू करून सर्व जखमींना विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

https://prahaar.in/2026/07/03/controversy-over-that-video-of-amit-satam-what-exactly-happened/

बसमधील प्रवासी वाळूज एमआयडीसीतील गरवारे कंपनीचे कामगार होते,अशी माहिती काही कामगारांनी दिली.अपघात प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here