Home ब्रेकिंग न्यूज Chandrashekhar Bawankule : माथेरान पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; दस्तुरी येथे 22 हजार चौ.मी. जागेवर होणार नवे वाहनतळ, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

Chandrashekhar Bawankule : माथेरान पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; दस्तुरी येथे 22 हजार चौ.मी. जागेवर होणार नवे वाहनतळ, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

0
Chandrashekhar Bawankule : माथेरान पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; दस्तुरी येथे 22 हजार चौ.मी. जागेवर होणार नवे वाहनतळ, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

मुंबई : माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दस्तुरी येथे सुमारे २२,३३३.७० चौरस मीटर शासकीय जागा वाहनतळासाठी माथेरान नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे माथेरानमध्ये अनेक वर्षांपासून भेडसावणारी पार्किंगची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे. (Chandrashekhar Bawankule)

https://prahaar.in/2026/07/03/inquiry-into-alleged-loan-irregularities-at-mahabaleshwarwadi-society-to-be-conducted-within-a-week-minister-of-state-for-home-dr-pankaj-bhoyar-gives-assurance-in-the-legislative-council/

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून महसूल विभागाने ३ जुलै रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.

ही जमीन रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दस्तुरी परिसरात असून भूखंड क्रमांक ९३, CTS क्रमांक ३ मध्ये आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील नियमांनुसार ही जागा ‘भोगवटादार वर्ग-२’ या अटींवर महसूलमुक्त स्वरूपात माथेरान नगरपरिषदेला देण्यात येणार आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील पर्यटनस्थळ (Tourism) असल्याने तेथे वाहनांना प्रवेश नाही. त्यामुळे सर्व पर्यटकांना आपली वाहने दस्तुरी नाक्यावरच उभी करावी लागतात. विशेषतः शनिवार-रविवार, सुट्ट्या आणि पर्यटन हंगामात पार्किंगसाठी मोठी अडचण निर्माण होत होती.

https://prahaar.in/2026/07/03/elevated-corridor-in-solapur-to-boost-industrial-development/

आता नव्या वाहनतळामुळे अधिक वाहनांची व्यवस्था होऊ शकणार असून पर्यटकांना पार्किंगसाठी तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागणार नाही. यामुळे वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे माथेरानमधील पर्यटनाला चालना मिळेल, स्थानिक व्यवसायांना फायदा होईल आणि पर्यटकांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here