मंत्री नितेश राणेंनी घेतला आढावा; आमदार निलेश राणे यांची बैठकीला उपस्थिती
मुंबई : सिंधुदुर्ग नगरी, ओरोस येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आणि देखणी शिवसृष्टी उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. या प्रस्तावित शिवसृष्टीच्या उभारणीबाबत शुक्रवारी मंत्रालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. महामार्गालगत उभारण्यात येणारी ही शिवसृष्टी भव्य, दिव्य, दर्जेदार आणि राज्यभरातून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरेल, अशा पद्धतीने त्याचे संपूर्ण नियोजन करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे(Nitesh Rane) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला आमदार निलेश राणे(Nilesh Rane) यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
https://prahaar.in/2026/07/03/elevated-corridor-in-solapur-to-boost-industrial-development/
ओरोस येथील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या आराखड्याबाबत जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबईचे प्राध्यापक विजय सकपाळ यांनी बैठकीत सविस्तर सादरीकरण (Presentation) केले. पालकमंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेत काम दर्जेदार करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतरच्या बैठकीत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना सध्या लागू असलेल्या ‘बल्क ग्राहक’ डिझेल दरामध्ये आवश्यक बदल करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. संबंधित विभागांनी या विषयावर आवश्यक उपाययोजनांची माहिती सादर केली असून, पालकमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत यावर पुढील तातडीची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
https://prahaar.in/2026/07/03/mystery-behind-ketans-murder-to-be-unravelled-siya-goyal-to-undergo-a-lie-detector-test/
या बैठकीला आमदार निलेश राणे यांच्यासह मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रदीप पी., मत्स्य उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, सहआयुक्त महेश देवरे यांच्यासह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.