मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मॅनहोल्समध्ये जाळ्या न बसवल्यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षे या असुरक्षित असलेल्या मुंबईकरांच्या सुरक्षेबाबत न्यायालयाने प्रश्नचिन्ह निर्माण केल्यानंतर कुर्ला येथील खैरानी रोडवरील मॅनहोलध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा पडून मृत्यू झाला. मात्र, मुंबईमध्ये रस्तो रस्ती पावलांखाली आजही मॅनहोल्सच्या माध्यमातून मृत्यूचे सापळे निर्माण झालेले आहेत. मुंबईत आजही तब्बल ४४४६ मॅनहोल्समध्ये जाळ्या अद्यापही लावलेल्या नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
https://prahaar.in/2026/07/02/colaba-bandra-seepz-mumbai-metro-3-line/
महापौर रितू तावडे यांच्या समोर पावसाळ्यात गटाराच्या चेंबरमध्ये अधिकारी पडल्यानंतर मॅनहोल्सचा मुद्दा तापल्यानंतर दोनच दिवसांपूर्वी याप्रकरणी न्यायालयानेही महापालिकेला झापून अजुनही किती वर्षे यासाठी लागणार असा सवाल केला होता. त्यानंतर गुरुवारी दुपारी खैरानी रोडवर जाळ्या बसवण्याचे काम सुरु असतानाच कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे यामध्ये ५५ वर्षीय व्यक्ती पडून त्यांचा मृत्यू झाला.
https://prahaar.in/2026/07/02/police-presence-in-mumbai-local-train-ladies-compartments-now-from-9-pm-to-8-am/
याबाबत महापालिका आयुक्त डॉ आश्विनी भिडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना या घटनेबाबत खेद व्यक्त केला. मृत व्यक्तीचा मृतदेह शंभर फुट अंतरावरील गटारात मिळाला आहे. यावेळी त्यांनी माहिती देताना असे म्हटले की, मुंबईमध्ये पर्जन्य जलवाहिनी व मलनि:सारण वाहिन्यांचे मिळून एकूण १ लाख ३ हजार ९२६ मॅनहोल्स आहेत. त्यातील ९६ हजार ३८३ मॅनहोल्सच्या जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. यापूर्वीपासून ही प्रक्रिया सुरु असून उच्च न्यायालयानेही याची दखल घेतली आहे. तयानुसार सर्व मॅनहोल्सच्या जाळ्या बसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आतापर्यंत ४४४६ मॅनहोल्समध्ये अद्यापही जाळ्य बसवण्याचे काम शिल्लक आहे. त्यात रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे सुरु असल्याने त्यात १८०० मॅनहोल्स बंद झाले असून रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर हे मॅनहोल्स तयार होवून त्यातही जाळ्या बसवण्यात येणार आहे. तसेच ज्या विभागामध्ये ही घटना घडली आहे, कुर्ला एल विभागात एकूण ७५ मॅनहोल्समध्ये जाळ्या बसवण्याचे काम शिल्लक होते. त्या जाळ्या बसवण्याचे काम हाती घेतल्यानंतर शेवटच्या चार शिल्लक जाळ्या बसवण्याचे काम हाती घेण्यात येत होते. त्यापैंकी या एका मॅनहोल्समध्ये जाळ्या बसवण्याचे काम सुरु असतानाच ही घटना घडली. दरम्यान, पावसाळा पूर्वी तयारीचा भाग म्हणून दखल घेत तीन महिन्यांपासून अनेक आढावा बैठका घेण्यात आल्या. यामध्ये सर्व मॅनहोल्स सुरक्षित आहेत की नाही, याची संपूर्ण डिटेल्स घेवून त्यांची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते,असेही भिडे यांनी स्पष्ट केले.