Home क्रीडा Abhishek Sharma : अभिषेक शर्माने रचला इतिहास ! फक्त ७८५ चेंडूंत केला मोठा विक्रम

Abhishek Sharma : अभिषेक शर्माने रचला इतिहास ! फक्त ७८५ चेंडूंत केला मोठा विक्रम

0
Abhishek Sharma : अभिषेक शर्माने रचला इतिहास ! फक्त ७८५ चेंडूंत केला मोठा विक्रम

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द झाला. मात्र, संघाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने बुधवारी (१ जुलै) झालेल्या पहिल्याच सामन्यात एक नवीन विक्रम रचला. या सामन्यापूर्वी, टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० षटकार पूर्ण करण्यासाठी अभिषेकला केवळ दोन षटकारांची गरज होती. त्याने पहिल्या नऊ चेंडूंमध्येच हा विक्रम मोडला. या सामन्यात त्याने अवघ्या २० चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले.

https://prahaar.in/2026/07/02/ind-vs-eng-t20-rain-plays-spoilsport-first-t20-match-between-india-and-england-called-off/

या कामगिरीसह, अभिषेक शर्मा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकारांचे शतक झळकावणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) (२०५), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) (१७९), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) (१२६) आणि विराट कोहली (Virat Kohli) (१२४) यांनी ही कामगिरी केली आहे. रिव्हरसाईड ग्राऊंडवर झालेल्या सामन्यात अभिषेक शर्माने २४ चेंडूंचा सामना करत चार षटकार आणि सहा चौकारांच्या जोरावर ५९ धावा केल्या. त्याने अवघ्या २० चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर भारताने २० षटकांत ७ बाद १८९ धावा उभारल्या. त्यानंतर सततच्या पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. इंग्लंडला फलंदाजीची संधीच मिळाली नाही.(Abhishek Sharma and Shreyas Iyer)

 

View this post on Instagram

 

A post shared by Team India (@indiancricketteam)

https://prahaar.in/2026/07/02/shreyas-iyers-historic-feat-first-indian-captain-to-score-a-half-century-in-england/

टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये १०० षटकार पूर्ण करण्यासाठी सर्वात कमी चेंडू घेणारे फलंदाज

अभिषेक शर्मा (भारत):  785 चेंडू

एविन लुईस (वेस्ट इंडीज):  789 चेंडू

फिन ॲलन (न्यूझीलंड):  871 चेंडू

टिम डेव्हिड (ऑस्ट्रेलिया):  939 चेंडू

सूर्यकुमार यादव (भारत):  1007 चेंडू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here