Home क्रीडा श्रेयस अय्यरची ऐतिहासिक कामगिरी! इंग्लंडमध्ये अर्धशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार

श्रेयस अय्यरची ऐतिहासिक कामगिरी! इंग्लंडमध्ये अर्धशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार

0
श्रेयस अय्यरची ऐतिहासिक कामगिरी! इंग्लंडमध्ये अर्धशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार

चेस्टर-ले-स्ट्रीट : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला आहे. मात्र, या सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इंग्लंडच्या भूमीवर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकावणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार ठरला.

https://prahaar.in/2026/07/02/what-do-the-meteorological-departments-red-orange-yellow-and-green-alerts-mean-get-the-full-details/

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर भारताने २० षटकांत ७ बाद १८९ धावा उभारल्या. त्यानंतर सततच्या पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. इंग्लंडला फलंदाजीची संधीच मिळाली नाही.

https://prahaar.in/2026/07/02/fifa-worldcup-2026a-record-number-of-disciplinary-actions-red-card-tally-reaches-12/

 

View this post on Instagram

 

A post shared by Team India (@indiancricketteam)

श्रेयस अय्यरचा ऐतिहासिक पराक्रम

या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आलेल्या श्रेयस अय्यरने संयम राखत ४७ चेंडूंत ६८ धावांची खेळी केली. त्याने १४४ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत ६ चौकार आणि १ षटकार लगावला. लियाम डॉसनच्या गोलंदाजीवर एक धाव घेत त्याने आपले नववे टी-20 आंतरराष्ट्रीय अर्धशतक पूर्ण केले. यासह त्याने एका नव्या विक्रमाला गवसणी दिली. यापूर्वी इंग्लंडमध्ये भारतीय कर्णधार म्हणून टी-20 क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या विराट कोहलीच्या (47 धावा) नावावर होती. आता श्रेयसने 68 धावांची खेळी करत हा विक्रम मोडीत काढला. विशेष म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनाही इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून टी-20 सामन्यात अर्धशतक करता आले नव्हते.

https://prahaar.in/2026/07/02/bachchu-kadu-only-sachin-has-arrived-for-now-the-entire-cricket-team-will-arrive-soon-bachchu-kadus-claim/

इंग्लंडमध्ये भारतीय कर्णधाराची सर्वोच्च टी-20 धावसंख्या :

68 धावा – श्रेयस अय्यर (चेस्टर-ले-स्ट्रीट, 2026)

47 धावा – विराट कोहली (कार्डिफ, 2018)

43 धावा – विराट कोहली (ब्रिस्टल, 2018)

31 धावा – रोहित शर्मा (बर्मिंगहॅम, 2022)

30 धावा – एमएस धोनी* (लॉर्ड्स, 2009)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here