मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कुर्ला पश्चिम येथील बुद्ध कॉलनीसमोरील दरडीच (Kurla Landslide) काही भाग कोसळण्याची घटना मंगळवारी रात्री घडली. मात्र, येथील काही कुटुंबांनी आधीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान येथील तीन कुटुंबांची पर्यायी जागेत व्यवस्था करण्यात आली आहे.
https://prahaar.in/2026/07/01/new-twist-in-the-ketan-agrawal-murder-case-siyas-video-goes-viral/
कुर्ला पश्चिम येथील एस. जी. बर्वे मार्ग, बुद्ध कॉलनीसमोर, अंबर बिल्डिंगच्या मागील या डोंगराळ भागावरुन दगड व काही माती खाली घसरत असल्याची घटना मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. त्यानंतर एल विभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी पहाणी केली. या ठिकाणी असलेल्या संरक्षक भिंतीच्या वर राहणाऱ्या ६ कुटुंबांपैकी ५ कुटुंबांनी यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. उर्वरित १ कुटुंबामध्ये एक दिव्यांग व्यक्ती असल्याने, एनडीआरएफ पथक आणि महानगरपालिका कर्मचायांच्या मदतीने त्या कुटुंबाला तसेच संरक्षक भिंतीच्या पायथ्याशी राहणाऱ्या २ कुटुंबांना तात्पुरत्या निवा-यांमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. या घटनेत जीवितहानीची झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे..