प्रलंबित निवृत्तीवेतन प्रकरणे निकाली काढण्यावर भर
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत प्राथमिक व माध्यमिक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित निवृत्तीवेतन (पेन्शन) दाव्यांचा आढावा घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या शुक्रवार ३ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही अदालत होणार आहे. उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिक्षणाधिकारी कार्यालय, त्रिवेणी संगम मनपा शालेय इमारत, त्रिवेणी सदनच्या मागे, महादेव पालव मार्ग, करी रोड (पूर्व), मुंबई येथे ही अदालत भरविण्यात येणार आहे.
https://prahaar.in/2026/07/01/raghav-chadha-relief-for-raghav-chadha-from-the-high-court-orders-issued-to-remove-defamatory-social-media-posts/
या पेन्शन अदालतीसाठी उपशिक्षणाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, मुख्य लिपिक, उपप्रमुख लेखापाल तसेच विविध लेखा अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकारी आवश्यक अहवालांसह उपस्थित राहणार आहेत. यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित निवृत्तीवेतन दाव्यांवर सुनावणी करून त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शिक्षण विभागातील ज्या निवृत्तीवेतनधारकांचे पेन्शन दावे अद्याप प्रलंबित आहेत, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ३ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता पेन्शन अदालतीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.