Home महाराष्ट्र नाशिक Nashik Crime : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या ; वर्षभरापूर्वीच झालं होतं लग्न अन… ; नाशिकमध्ये खळबळ

Nashik Crime : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या ; वर्षभरापूर्वीच झालं होतं लग्न अन… ; नाशिकमध्ये खळबळ

0
Nashik Crime : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या ; वर्षभरापूर्वीच झालं होतं लग्न अन… ; नाशिकमध्ये खळबळ

Nashik Crime : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. वर्षभरापूर्वीच लग्नबंधनात अडकलेला अनिकेत बाळासाहेब जगताप (वय 27) (Aniket Balasaheb Jagtap) याने पत्नी श्रुती धिवरेला (Shruti Dhivare) कंटाळून आत्महत्या केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून जगताप कुटुंबियांवर आभाळ कोसळलं आहे.

https://prahaar.in/2026/07/01/nashik-accident-caused-by-defective-road-municipal-corporation-to-pay-compensation/

नेमकं प्रकरण काय ?

नाशिकच्या मालेगाव कॅम्प (Malegaon Camp) भागातील साने गुरुजी नगरात अनिकेत बाळासाहेब जगताप राहत होता. अनिकेतचा वर्षभरापूर्वी मोठ्या उत्साहात पंचशील नगरातील श्रुती धिवरे या तरुणीशी विवाह झाला होता. मात्र, विवाह झाल्यापासूनच दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणातून सतत वाद होत होते. वर्षभरापूर्वीच लग्न झालेली श्रुती ही सासरी नांदायला येत नव्हती. तिने अनिकेतविरुद्ध पोलिसात तक्रार (Police complaint) केली होती. या तक्रारीमुळे अनिकेत गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होता. आणि याच त्रासाला कंटाळून अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरात गळफास घेतला आहे असा आरोप अनिकेतच्या कुटुंबीयांनी केला आहे.

https://prahaar.in/2026/07/01/ubt-how-many-ubt-votes-will-defect-in-the-deputy-chairman-election/

आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल

अनिकेतच्या आत्महत्येनंतर सुरुवातीला या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र अनिकेतचे वडील बाळासाहेब जगताप यांनी कॅम्प पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अनिकेतचा मानसिक छळ केल्याप्रकरणी पत्नी श्रुती जगताप, सासू वंदना सुभाष धिवरे, सासरे सुभाष सुकदेव धिवरे आणि मामे सासू उज्वला सतीश पवार (सर्व रा. पंचशील नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

https://prahaar.in/2026/07/01/mega-sanitation-plan-for-the-nashik-trimbakeshwar-kumbh-mela/

…तर आत्मदहन करू, जगताप कुटुंबीयांचा इशारा 

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत सासू आणि सासरे यांना अटक केली आहे तर पत्नी श्रुती आणि मामेसासू उज्वला पवार हे फरार झाले आहेत. श्रुतीला आणि मामे सासूला तत्काळ अटक करा अन्यथा आत्मदहन करू असा इशारा मयत अनिकेच्या कुटुंबीयांनी दिला आहे. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज निकम करीत आहेत.

एकीकडे हुंडाबळी , आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून अनेक विवाहित महिला आत्महत्या करत आहे तर दुसरीकडे पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या पुरुषांच्या घटना देखील समोर येत आहेत. त्यामुळे याठिकाणी पुरुषांच्याही बाजू , वेदना समजावून घेत अशा स्त्रियांवर देखील कठोर कारवाई होणे गरजेचे आहे असा सूर उमटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here