– महिला व बालिकांवरील अत्याचारांबाबत सरकारची शून्य सहनशीलतेची भूमिका
मुंबई : नसरापूर बालिका बलात्कार आणि हत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी या निर्णयाचे स्वागत करत महाराष्ट्रात कायद्याचे राज्य असून गुन्हेगारांना कोणतेही अभय मिळणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिला. विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा निर्णय न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणारा असल्याचे सांगितले.
उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले की, न्यायालयाच्या या निकालामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे. महिलांवर आणि बालिकांवर अत्याचार करणाऱ्यांसाठी हा कठोर आणि स्पष्ट संदेश असून, अशा घृणास्पद गुन्ह्यांना महाराष्ट्रात कोणतीही माफी नाही.
https://prahaar.in/2026/06/29/fishing-ban-in-the-state-extended-till-august-15/
“अशा नराधमांना समाजात किंवा कायद्याच्या राज्यात स्थान नाही. महिलांवर, मुलींवर आणि लहान बालिकांवर अत्याचार करणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत राहून कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच हवी,” असेही शिंदे यांनी ठामपणे सांगितले. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. प्रत्येक महिला आणि मुलगी सुरक्षित वातावरणात जगू शकेल, यासाठी सरकार सातत्याने प्रभावी उपाययोजना राबवत आहे. (DCM Eknath Shinde)
गुन्ह्यांचा जलद तपास, फास्ट ट्रॅक न्यायालयांमार्फत खटल्यांचा वेगाने निपटारा आणि दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. (DCM Eknath Shinde)
https://prahaar.in/2026/06/29/sunetra-pawar-welcomes-the-death-sentence-in-the-nasrapur-case/
View this post on Instagram