भुवनेश्वर : राष्ट्रीय आंतर-राज्य ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (National Inter-State Athletics Championship) केरळच्या (Kerala) स्टार लांब उडीपटू (Long Jumper) अँसी सोजनने (Ancy Sojan) भारतीय ऍथलेटिक्समध्ये (Indian Athletics) इतिहास रचला आहे. अँसीने ६.८८ मीटरची दमदार उडी मारत माजी दिग्गज अंजू बॉबी जॉर्ज (Anju Bobby George) यांच्या नावावर तब्बल २२ वर्षांपासून कायम असलेला राष्ट्रीय विक्रम (National Record) मोडला.
२५ वर्षीय अँसी सोजनने भुवनेश्वर (Bhubaneswar) येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या चौथ्या दिवशी ही ऐतिहासिक कामगिरी केली. तिने पाचव्या प्रयत्नात (Fifth Attempt) ६.८८ मीटरची उडी मारून अंजू बॉबी जॉर्ज यांनी २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिक (Athens Olympics 2004) दरम्यान नोंदवलेला ६.८३ मीटरचा राष्ट्रीय विक्रम मागे टाकला.
https://prahaar.in/2026/06/28/ind-vs-ire-t20-rain-threat-looms-over-the-second-t20-match-between-india-and-ireland-vaibhav-suryavanshis-debut-in-doubt/
विशेष म्हणजे, अँसीने पहिल्याच प्रयत्नात ६.७३ मीटरची उडी मारत भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या (Athletics Federation of India – AFI) आशियाई खेळांसाठी (Asian Games) निश्चित केलेल्या ६.४८ मीटरच्या पात्रता निकषालाही (Qualification Mark) सहज गाठले. त्यानंतर पाचव्या प्रयत्नात तिने राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला.
अँसी सोजन याआधीही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी कामगिरी करत आली आहे. २०२३ च्या हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत (Hangzhou Asian Games 2023) तिने ६.६३ मीटरची उडी मारत रौप्यपदक (Silver Medal) जिंकले होते.
२४ ते २८ जूनदरम्यान भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय आंतर-राज्य ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अनेक भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत आशियाई स्पर्धांसाठी पात्रता मिळवली. यामध्ये पुरुष पोल व्हॉल्ट (Men’s Pole Vault) स्पर्धेत देव मीना, महिला १०० मीटर अडथळा शर्यतीत (100m Hurdles) ज्योती याराजी, महिला हॅमर थ्रो (Hammer Throw) स्पर्धेत अनुष्का यादव आणि पुरुष ८०० मीटर शर्यतीत (800m Race) मोहम्मद अफसल यांचा समावेश आहे.
https://prahaar.in/2026/06/28/fifa-world-cup-2026-messi-rested-argentinas-opening-goal-disallowed-due-to-offside/
अँसी सोजनच्या या ऐतिहासिक विक्रमामुळे भारतीय ऍथलेटिक्सला नवी ऊर्जा मिळाली असून, आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिच्याकडून आणखी मोठ्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.