मुंबई : मुंबईतीळ अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. मात्र आता कल्याण मधील शिळफाटा परिसरातून दररोज जे जीवघेण्या ट्रॅफिक मधून प्रवास करणाऱ्याना आता मोठा दिलासा मिळणार आहे. कल्याण शिळफाट्यावरील प्रवास मात्र आता अवघ्या १५ मिनिटात होणार आहे. ज्याप्रवासाला आधी ३० ते ४० मिनिटे लागायची तो आता काही मिनिटात होणारअसल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदच वातावरण आहे. परिसरातील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा लवकरच पूर्णत्वास येणार आहे.
https://prahaar.in/2026/06/27/sharad-pawar-faction-mp-bajrang-sonawane-met-the-chief-minister/
फक्त कल्याण मध्येच नाही तर आणखी काही ठिकाणी
नवी मुंबई मधील ऐरोली- काटई(Airoli-Katai) नाका उन्नत मार्ग प्रकल्पाचे पहिला आणि दुसरा टप्पा हा अंतिम टप्प्यात आलेला असून लवकरच हे वाहतुकीसाठी सुरु करण्यात येणार आहेत असे एमएमआरडीएने सांगितले आहे. यामुळे नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि आसपासच्या भागातील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

साधारण 12.71 किलोमीटर लांबीचा या उन्नत मार्ग खरं तर मुंबई महानगरातील महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक मानला जातोय. हा मार्ग सुरु होताच ऐरोली ते डोंबिवली दरम्यानचे अंतर 10 किलोमीटरने कमी होईल. महत्त्वाचे म्हणजे 30 ते 45 मिनिटांचा प्रवासाचा वेळ वाचून तो नवी मुंबई ते डोंबिवली शहर(Navi Mumbai to Dombivli) हे अंतर फक्त 15 मिनिटांत पार करता येणार आहे. या प्रकल्पातील ठाणे-बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग(Thane-Belapur Road to National Highway) 4 या 3.45 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे अधिक काम 92 टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे तर दुसरीकडे ऐरोली ते ठाणे-बेलापूर रोड 2.57 किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे कामही पूर्ण झालेले आहे.
![]()
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे(Dr. Shrikant Shinde) यांनी या महत्त्वाच्या प्रकल्पाला गती मिळावी म्हणून सातत्याने जात पाठपुरावाही केला होता. शिवाय अनेक वेळा याबाबत बैठका, प्रत्यक्ष जात पाहणी शिवाय संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या होता. त्यामुळे या प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्यात यश आले. या दोन्ही टप्प्यांचे उद्घाटन हे जुलै महिन्यात एकाच वेळी करुन वाहतूकीसाठी खुले करण्याचा विचार सुरु आहे. हा मार्ग सुरु होताच महापे, शिळफाटा, कल्याण फाटा, ठाणे-बेलापूर या सर्व मार्गावरील वाहतूक वेगवान होईल.