Home ब्रेकिंग न्यूज BMC News : महापालिका सभागृहात उंदराचा प्रवेश, नगरसेवकांमध्ये घबराट

BMC News : महापालिका सभागृहात उंदराचा प्रवेश, नगरसेवकांमध्ये घबराट

0
BMC News : महापालिका सभागृहात उंदराचा प्रवेश, नगरसेवकांमध्ये घबराट
BMC

मुंबई : एका उंदराने मुंबई महापालिका सभागृहातील नगरसेवकांची झोप उडवली. गुरुवारी रात्री ९वाजता महापालिका सर्वसाधारण सभेत एका उंदराने प्रवेश केला आणि नगरसेवकांमध्ये चुळबुळ सुरू झाली. सभागृह नेते गणेश खणकर यांनी मात्र ही घटना सकारात्मक घ्या, पाऊस येणार,अशी आशा व्यक्त केली.

https://prahaar.in/2026/06/26/dombivlis-shardul-vichare-secures-first-rank-nationwide-in-ca-intermediate/

महापालिका सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी सुरू झाली. रात्री ९ वाजता भाजप नगरसेविका प्रिती सातम या हरकतीचा मुद्दा मांडण्यासाठी उभ्या होत्या.. त्यांनी मुद्दा मांडण्यास सुरुवात करताच कॉग्रेसचे नगरसेवक जिथे बसले होते तिथे उंदराने प्रवेश केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली. त्यानंतर सभागृह नेते खणकर एका विषयावर मत व्यक्त करत असताना, पुन्हा आजूबाजूला बसलेल्या नगरसेtags

वकांची हालचाल सुरू झाली. महिला नगरसेविकांमध्ये घबराट पसरली. कोण म्हणाले पाय वर घेऊन बसा, तर कोण गेला का बघा, म्हणत खिल्ली उडवत होते. समोरून ‘पिंजरा आणा, पिंजरा’असा आवाज एका नगरसेवकाने दिला. त्यावर खणकर यांनी विरोधी पक्षांना सकारात्मक घेण्याचा सल्ला दिला. “मी खूप ओपन माइंड माणूस आहे. जे घडते त्यामुळे मी व्यथित होत नाही. परवा आपण पाण्याचे निवेदन दिले, सगळ्यांनी भाषणे केली आणि चमत्कार झाला रात्री पाऊस आला. त्यामुळे सकारात्मक घ्या. गणपती बाप्पाचे वाहन आहे. आता समजून जा की आज किंवा उद्या, छप्पर फाड के बारिश, होणार,” असे सांगून उंदराच्या पुढील चर्चेला विराम दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here