Home ब्रेकिंग न्यूज Strait of Hormuz : ३० भारतीय जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडली ; तेल, वायू अन् खतांचा जहाजात समावेश, २० हून अधिक जहाजे रांगेत

Strait of Hormuz : ३० भारतीय जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडली ; तेल, वायू अन् खतांचा जहाजात समावेश, २० हून अधिक जहाजे रांगेत

0
Strait of Hormuz : ३० भारतीय जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडली ; तेल, वायू अन् खतांचा जहाजात समावेश, २० हून अधिक जहाजे रांगेत

३० भारतीय जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडली

नवी दिल्ली : इराण आणि अमेरिका यांच्यातील सामंजस्य करारामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्याची ‘जीवनरेखा’ मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.आतापर्यंत भारताशी संबंधित ३० जहाजांनी या मार्गावरून सुरक्षित प्रवास केला आहे, तर २६ जहाजे अद्याप आखाती प्रदेशात प्रतीक्षेत आहेत. प्रवास केलेल्या ३० जहाजांमध्ये एलपीजी, एलएनजी, कच्चा तेल आणि खते/बल्क कार्गोचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या करारानंतर जहाजांच्या हालचाली दुप्पट झाल्या असून, ही फेब्रुवारीनंतरची सर्वोच्च पातळी आहे.

https://prahaar.in/2026/06/25/mp-sanjay-patil-apologized-over-the-journalist-controversy/

या मार्गावरून जगातील २०% तेल आणि वायू पुरवठा होतो. तणाव कमी झाल्यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमतीत घट झाली असून भारताच्या ऊर्जा आयातीला मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या अमेरिका-इराण चर्चेवर जागतिक सागरी व्यापाराची पुढील स्थिरता अवलंबून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here