Home ब्रेकिंग न्यूज Mumbai Dams : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतही पावसाची हजेरी

Mumbai Dams : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतही पावसाची हजेरी

0
Mumbai Dams : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतही पावसाची हजेरी
Mumbai Dams

मुंबई (विशेष प्रतिनिधी )

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणातील (Mumbai Dams) पाणीसाठा घटल्याने महापालिकेने मुंबईत १५ मेपासून १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. तर व्यावसायिक पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात केली आहे. २२ जून रोजीपर्यंत तर मुंबईला पावसाने चांगलीच ओढ दिल्याने मुंबईकर चिंतातुर झाले होते. त्यातच गेल्या २४ तासात सात धरणांमध्ये किमान ५२ मिमी ते २६३ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.त्यामूळे तलाव क्षेत्रात पडलेला पाऊस हा मुंबईकरांसाठी आनंदाची बाब आहे.

https://prahaar.in/2026/06/25/dr-vipin-sharma-personally-experienced-the-hospital-management-information-system/

मुंबईला सध्या सात धरणांमध्ये (Mumbai Dams) फक्त मंगळवारी सकाळी ६.०० वाजेपर्यंत १,१६,८०८ दशलक्ष लिटर (८.०७ टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक होता. त्यामधून बुधवारी सकाळपर्यंत दैनंदिन ४१०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा मुंबईला करण्यात आला. त्यामुळे सात धरणांमध्ये १,१२,७०८ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक होता. मात्र गेल्या २४ तासात धरणांमध्ये चांगला पाऊस पडल्याने पाणीसाठ्यात काहीशी वाढ झाली आहे. २४ जून रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत सात धरणांमध्ये १,१४,८६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाल्याची नोंद करण्यात आली आहे. (Mumbai Dams)

https://prahaar.in/2026/06/25/prajakta-lavangare-has-assumed-charge-as-the-additional-municipal-commissioner/

धरणातील पाणीसाठ्याबाबत २४ जून सकाळी ६.०० वाजेपर्यंतची माहिती -:
—————————————————— —

तलाव पाणीसाठा द.लि. पडलेला पाऊस मिमी

अप्पर वैतरणा -: ० ०.००

मोडक सागर -: २६३७५  – ३२.००

तानसा – २६८४   –  ६८.००

मध्या वैतरणा २१२५७  – १३.००

भातसा -: ५०२७७   –  ७०.००

विहार -: १२४९९   – १४२.००

तुळशी -: १७७२   – २६३.००
——————————————————–
सन २०२४  ११४८६३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here