Home क्राईम Nashik Crime News : मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांवर गुन्हेगारांचा डोळा; डोळ्यात मिरची पूड फेकली अन…

Nashik Crime News : मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांवर गुन्हेगारांचा डोळा; डोळ्यात मिरची पूड फेकली अन…

0
Nashik Crime News : मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांवर गुन्हेगारांचा डोळा; डोळ्यात मिरची पूड फेकली अन…
mumbaiCrime

Nashik Crime News : ग्रामीण भागात महिला बचतगटांचे पैसे गोळा करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या (Microfinance companies) कर्मचाऱ्यांवर आता गुन्हेगारांनी मोर्चा वळवला की काय असा प्रश्न एका घटनेनं उपस्थित झाला आहे. हरसूल पोलीस ठाण्याच्या (Harsul Police Station) हद्दीत भरदिवसा एका फायनान्स कर्मचाऱ्याच्या डोळ्यांत मिरची पूड फेकून रोख रक्कम व टॅब लुटण्यात आला. लूट करणाऱ्या तिघा अट्टल चोरट्यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Rural Police ) अटक केली आहे.

https://prahaar.in/2026/06/24/raigad-fort-steps-leading-to-raigad-fort-closed-until-june-25-due-to-a-landslide/

नेमकं काय घडलं ?

५ जून २०२६ रोजी ‘एयू फायनान्स’ कंपनीचा कर्मचारी नवनाथ मोरे हे लाडची गावातून पारधपाडा येथे मोटारसायकलवरून जात होते. त्यांच्याकडे महिला बचतगटांकडून जमा केलेली ८४ हजार ८८० रुपयांची रक्कम आणि हिशोबासाठी वापरण्यात येणारा सॅमसंग कंपनीचा टॅब होता. निर्जन रस्त्यावर पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या स्पोर्ट्स बाईकवरील दोन संशयितांनी त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड फेकली. त्यामुळे मोरे यांचा ताबा सुटून ते खाली पडले. याच संधीचा फायदा घेत आरोपींनी पैशांची बॅग आणि टॅब हिसकावून विळवंडीच्या दिशेने पलायन केले.

https://prahaar.in/2026/06/24/kolhapur-sounds-directly-at-fifas-doorstep/

संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

या धाडसी लुटीमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी व अपर पोलीस अधीक्षक विमला एम. यांच्या मार्गदर्शनाखाली हरसूल पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत सापळा रचला. या कारवाईत योगेश लहानू फसाळे (वय २०, रा. लाडची), जयराम महादू पारधी (वय २१, रा. पारधीपाडा) आणि सोपान हरी पारधी (वय २१, रा. पारधीपाडा) यांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

https://prahaar.in/2026/06/24/ind-vs-pak-indias-thrilling-victory-over-pakistan-kickstarts-fih-pro-league-campaign-with-a-4-3-win/

३.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्पोर्ट्स मोटारसायकल (एमएच १५ केएक्स ७२६५), रोख रक्कम, सॅमसंग टॅबलेट आणि तीन महागडे मोबाईल असा एकूण ३ लाख ६३ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

https://prahaar.in/2026/06/24/22-year-old-man-dies-of-electric-shock/

महागड्या बाईकची ‘क्रेझ’ आणि वाढती रोड रॉबरी

ग्रामीण भागात रस्त्यावरील लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंता या घटनेमुळे व्यक्त केली जात आहे. विशेषतः महागड्या मोटारसायकली आणि चैनीच्या वस्तूंच्या हव्यासापोटी काही तरुण गुन्हेगारीकडे वळत असल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे. या प्रकरणातील आरोपींकडे महागडी स्पोर्ट्स बाईक कशी आली, ती त्यांनी स्वतः विकत घेतली होती की अन्य मार्गाने मिळवली, याचाही पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, अशा घटनांना आळा घालण्यासाठी नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांनी आपल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे रस्त्यांच्या दिशेने बसवावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, उपनिरीक्षक सुनील आहेर, हवालदार अनिल गांगुर्डे, नामदेव गांगुर्डे, अंमलदार भारत खाडे, हेमंत गिलबिले आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here