Home ब्रेकिंग न्यूज Uddhav Thackeray : खासदारफुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या बैठकीला ४ आमदारांची दांडी

Uddhav Thackeray : खासदारफुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या बैठकीला ४ आमदारांची दांडी

0
Uddhav Thackeray : खासदारफुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या बैठकीला ४ आमदारांची दांडी
UBT Faction,

मुंबई : उबाठा गटातील सहा खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरु असून सोमवारी, शिवालय या पक्ष कार्यालयात त्यांनी सर्व आमदारांची बैठक घेतली. यावेळी उबाठा गटाचे ४ आमदार बैठकील अनुपस्थित होते.

https://prahaar.in/2026/06/22/uddhav-thackeray-should-have-taken-precautions-earlier-says-mla-nilesh-rane/

उबाठा गटाच्या लोकसभेतील सहा खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे, खासदारांनंतर आता उबाठा गटाचे आमदारही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदेंच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, आपल्या लोकप्रतिनिधींची एकजूट कायम ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सर्व आमदारांची बैठक घेतली.

https://prahaar.in/2026/06/22/cold-war-internal-infighting-within-the-ubt-faction/

उबाठा गटाचे विधानसभेत २० आणि विधानपरिषद ६ असे एकूण २६ आमदार आहेत. यापैकी विधानसभेतील १७ तर विधानपरिषदेतील ५ आमदार बैठकीला उपस्थित होते. विधानसभेचे संजय पोतनीस, संजय देरकर, राहुल पाटील हे आमदार बैठकीला अनुपस्थित होते. तर, विधानपरिषदेचे सुनील शिंदे या बैठकीला अनुपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here