Home ब्रेकिंग न्यूज BMC : घाटकोपरमधील जाहिरात फलक दुघर्टना: क्रेन आणि क्रशरचा खर्च सुमारे ४१ लाख रुपये

BMC : घाटकोपरमधील जाहिरात फलक दुघर्टना: क्रेन आणि क्रशरचा खर्च सुमारे ४१ लाख रुपये

0
BMC : घाटकोपरमधील जाहिरात फलक दुघर्टना: क्रेन आणि क्रशरचा खर्च सुमारे ४१ लाख रुपये

दोन वर्षांनी राडारोडा उचलेल्या खचाची झाली आठवण

मुंबई(विशेष प्रतिनिधी)

मुंबईतील घाटकोपर (Ghatkopar) येथील महाकाय जाहिरात होर्डींग कोसळून १७ जणांचा मृत्यू (Death) झाला होता. या दुघर्टनंतर येथील राडारोडा हटवण्यासाठी महापालिकेस सर्वच यंत्रणांचे हात कामाला लागले. परंतु हा महाकाय जाहिरात फलक हटवण्यासाठी तब्बल ४० लाखांहून अधिक रुपये खर्च झाले आहे. या दुघर्टनेला दोन वर्ष उलटून गेल्यानंतर प्रशासनाला या जाहिरात फलकाचे अवशेष उचलण्यासाठी वापरण्यात आलेल्या क्रेन आणि क्रुशर यांच्या खर्चाची आठवण झाली आहे. विशेष म्हणजे ही दुघर्टना १३ मे २०२४ रोजी घडली आणि या कामाचा खर्च देण्यासाठी संबंधित कंपनीला २८ मार्च रोजी कार्यादेश बजावून त्यांच्या बिलाची रक्कम देण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

https://prahaar.in/2026/06/21/the-induction-of-three-indigenous-warships-into-the-indian-navy-fleet-symbolizes-growing-capability-self-reliance-and-modernization/

घाटकोपरमधील छेडा नगरात जाहिरात फलक (होर्डिंग) कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकूण १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर या फलकाचे सुटेभाग व राडारोडा हटवण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले होते. जाहिरात फलक कापून केलेले सुटे भाग तसेच इतर राडारोडा (डेब्रीज) इत्यादी हटवण्याचे काम हाती घेण्याचे निर्देश देत ही कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात आली होती. यासाठी महापालिकेच्यावतीने खासगी संस्थेच्या माध्यमातून हाय रि जॉ क्रुशर तसेच २२० व १४ टन क्रेन पुरवण्यात आले. महापालिकेच्यावतीने यासाठी ए टू झेड स्क्रॅप्स या कंपनीकडून ही सेवा घेतली होती. यासाठी प्रत्येकी २२.४५ लाख रुपये आणि १८.४० लाख रुपयांचा खर्च झाला होता.

https://prahaar.in/2026/06/21/chaos-ensued-as-entry-was-denied-to-latecomers-at-the-neet-exam-which-was-conducted-under-strict-security-and-stringent-rules/

याबाबतच्या देयकांकरता चक्क २८ मार्च २०२६ रोजी कार्यादेश देण्यात आले. त्यामुळे याचे पेमेंट देण्यासाठी दोन वर्षे का उजाडली असा प्रश्न उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here