मुंबई : महाराष्ट्रात जून महिन्याच्या सुरुवातीला दाखल झालेला मान्सून गेल्या काही दिवसांपासून रखडल्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण आहे. ६ जून रोजी तळकोकणात आगमन झाल्यानंतर ८ जूनपासून मान्सून दक्षिण कोकणातील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे एकाच जागी स्थिर आहे. अनुकूल हवामान प्रणाली अभावी मान्सूनचा प्रवास मंदावला असून राज्यात जून महिन्याच्या सरासरीच्या केवळ २२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. परिणामी, राज्यात तब्बल ७८ टक्के पावसाची मोठी तूट निर्माण झाली असून शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. मात्र, आता हवामान विभागाने दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात मान्सूनच्या पुढील वाटचालीला गती देणारी हवामान प्रणाली सक्रिय होत आहे. २३-२४ जूनपासून परिस्थिती अनुकूल होऊन २५ जूननंतर पावसाचा जोर वाढेल आणि १ जुलैपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी सकाळपासून मुंबईसह उपनगराच्या काही भागांत पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली आहे.
https://prahaar.in/2026/06/21/chaos-ensued-as-entry-was-denied-to-latecomers-at-the-neet-exam-which-was-conducted-under-strict-security-and-stringent-rules/
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील पूर्वेकडील व ईशान्येकडील वारे आणि अरबी समुद्रातील उत्तरेकडील वाऱ्यांमधील तफावत, गुजरात ते ओडिशा दरम्यान निर्माण झालेला उच्च दाबाचा पट्टा, तसेच हिमालयाच्या पश्चिम भागातील चक्रवाताचा प्रभाव यामुळे मॉन्सूनची प्रगती मंदावली आहे. याशिवाय, विषुववृत्तीय प्रशांत महासागरात ‘एल निनो’ सक्रिय झाला असून जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. महासागर आणि वातावरणातील ही स्थिती भारतीय मॉन्सूनसाठी प्रतिकूल मानली जात असल्याने, यंदाच्या हंगामात पावसाचे असमान वितरण आणि काही भागांत पावसाची कमतरता राहू शकते.
https://prahaar.in/2026/06/21/dharashiv-mp-omraje-nimbalkar-to-accept-shindes-leadership-and-join-shiv-sena/
२५ जूननंतर हवामानात बदल
२५ जून ते १ जुलै या कालावधीत सोमालिया किनारपट्टीकडून भारताच्या दिशेने बाष्प घेऊन येणारे वारे मजबूत होणार आहेत. मध्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होणार असल्याने मध्य आणि दक्षिण भारतात पश्चिमेकडील वाऱ्यांचा प्रभाव वाढेल. यामुळे कोकण किनारपट्टीसह राज्यातील बहुतांश भागात चांगल्या पावसाचा अंदाज आहे.
‘यलो अलर्ट’ (वादळी पाऊस): सोलापूर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट भागात आज वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
हलक्या सरींचा अंदाज: मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, पुणे आणि पुणे घाट, सातारा आणि सातारा घाट, सांगली, धाराशिव, लातूर आणि नांदेड.
विदर्भाची स्थिती: विदर्भातील बहुतांश भागात आज उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती राहण्याचा अंदाज असून, काही भागांत वादळी पावसाचीही शक्यता आहे.
https://prahaar.in/2026/06/21/new-industries-to-be-strengthened-in-kolhapur/
पावसाची सद्यस्थिती
धुळे, नंदूरबार आणि ठाणे: १००% तूट
धाराशिव: ३८% तूट
सांगली: ४९% तूट
सोलापूर: ४७% तूट
लातूर: ४१% तूट.
बीड आणि चंद्रपूर: ५४% तूट
नागपूर: ५१% तूट.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांत ६० ते ९९ टक्के कमी पाऊस झाला आहे.