नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोलकाता येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. हा कार्यक्रम संपवून दिल्लीला आल्यानंतर पंतप्रधान मोदी तब्बल ४५ मिनिटे दिल्ली विमानतळावरच थांबले होते. याआधी पंजाबमध्ये अचानक रस्त्यावर आलेल्या आंदोलकांमुळे पंतप्रधान मोदींच्या गाड्यांचा ताफा एका ठिकाणी काही मिनिटे थांबून होता. नंतर सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधानांच्या पुढील कार्यक्रमात तातडीने बदल करण्यात आले होते. यामुळे दिल्ली विमानतळावर पंतप्रधान ४५ मिनिटे थांबल्यावर चर्चेला उधाण आले होते. अखेर सत्य समजले आणि तर्कवितर्क थांबले.
नीट यूजी फेरपरीक्षेचे आयोजन दिल्लीसह देशभर करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी चाललेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पंतप्रधान मोदी दिल्ली विमानतळावरच ४५ मिनिटे थांबले होते.
https://prahaar.in/2026/06/21/minister-girish-mahajan-lodges-complaint-with-cyber-department-and-chief-minister-regarding-viral-photo-incident/
पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा निघण्याआधीच अनेक रस्त्यांवरील वाहतूक थांबवली जाते. ताफा ठराविक अंतर पुढे गेला की वाहतूक पुन्हा सुरू केली जाते. सुरक्षेच्या कारणास्तव मागील अनेक वर्षांपासून ही पद्धत अवलंबली जात आहे. या पद्धतीमुळे मोदींच्या गाड्यांचा ताफा निघाला असता तर दिल्लीतील अनेक रस्त्यांवरची वाहतूक थांबवावी लागली असती. नीट परीक्षेला जात असलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली असती. ही बाब लक्षात ठेवून पंतप्रधान मोदींनी परीक्षा सुरू होईपर्यंत विमानतळावरून बाहेर पडणे टाळले. दुपारी दोन वाजता देशभर नीट यूजी फेरपरीक्षा सुरू झाली आणि दिल्ली विमानतळावरून पंतप्रधान मोदींच्या वाहनांचा ताफा निघाला.
https://prahaar.in/2026/06/21/rapper-sultan-dhillon-makes-a-shocking-claim-in-the-sidhu-moose-wala-murder-case-lawrence-bishnoi-enters-the-picture/
पंतप्रधानांचा ताफा दुपारी सव्वा वाजता (१:१५ वाजता) विमानतळावरून निघला असता पण नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी पंतप्रधान मोदींनी दिल्ली विमानतळावर ४५ मिनिटे थांबवण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पंतप्रधान मोदींनी स्वतःच्या कार्यक्रमात मोठा बदल केल्यामुळे सोशल मीडियात चर्चेला उधाण आले आहे.
https://prahaar.in/2026/06/21/varun-chakravarthy-major-blow-for-india-ahead-of-the-ireland-series-star-bowler-out-of-the-squad/
याआधी ३ जून रोजी नीट यूजी परीक्षा झाली. पण पेपर फुटला असल्याचे परीक्षा सुरू झाल्यानंतर काही वेळाने लक्षात आले. अखेर केंद्र सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नीट यूजी फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. ही परीक्षा आज म्हणजेच रविवार २१ जून रोजी झाली. फेरपरीक्षा होण्याआधीच केंद्रीय तपास यंत्रणांनी स्थानिक तपास यंत्रणांच्या सहकार्याने वेगाने कारवाई करून पेपरफुटी प्रकरणी अनेकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये पेपर सेट करणारे प्राध्यापक तसेच काही खासगी कोचिंग क्लास चालक यांचा समावेश आहे.