Home क्रीडा IPL IPL 2027 : रिषभ पंत पुन्हा दिल्ली कॅपिटल्समध्ये ? कुलदीप यादव लखनऊ मध्ये !आयपीएल ट्रेडमध्ये कोणाला फायदा ?

IPL 2027 : रिषभ पंत पुन्हा दिल्ली कॅपिटल्समध्ये ? कुलदीप यादव लखनऊ मध्ये !आयपीएल ट्रेडमध्ये कोणाला फायदा ?

0
IPL 2027 : रिषभ पंत पुन्हा दिल्ली कॅपिटल्समध्ये ? कुलदीप यादव लखनऊ मध्ये !आयपीएल ट्रेडमध्ये कोणाला फायदा ?

Mumbai : आयपीएल २०२७ (IPL 2027) पूर्वी ट्रेडमुळे चर्चा रंगल्या आहेत. भारताचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सच्या जर्सीत दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात मोठ्या खेळाडूंच्या अदलाबदलीबाबत चर्चा सुरू असून या व्यवहारात कुलदीप यादवचे नाव समोर येत आहे. या ट्रेड डिल्समुळे क्रिकेट विश्वात वेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) रिषभ पंतला २०२५ च्या हंगामात तब्बल २५ कोटी रुपयांत संघात घेतले होते. मात्र सलग दोन हंगामांच्या अपयशामुळे फ्रँचायझी नव्या नेतृत्वाचा विचार करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पंत आणि लखनऊ यांचे मार्ग वेगळे होण्याची शक्यता वाढली आहे.

https://prahaar.in/2026/06/20/raj-thackeray-white-stripe-politics-aimed-at-diverting-attention-from-the-election-process/

27 कोटी परत मिळणार का ?

या ट्रेडमधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पंतच्या मानधनात मोठी कपात करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. रिपोर्ट्सनुसार, दिल्ली कॅपिटल्समध्ये पुनरागमन करण्यासाठी तो 27 कोटींवरून थेट 15 कोटी रुपयांच्या करारावर खेळण्यास तयार आहे. म्हणजेच तब्बल 12 कोटी रुपये कमी स्वीकारण्याची त्याची तयारी असल्याचे सांगितले जात आहे.

https://prahaar.in/2026/06/20/fifa-world-cup-2026-turkeyi-vs-paraguay/

कुलदीप यादव लखनऊच्या रडारवर

या संभाव्य व्यवहारात दिल्लीचा प्रमुख फिरकीपटू कुलदीप यादव लखनऊ सुपर जायंट्समध्ये दाखल होऊ शकतो. विशेष म्हणजे कुलदीप उत्तर प्रदेशचा असल्याने घरच्या राज्यातील संघासाठी खेळण्याची संधी त्याला मिळू शकते. त्याचे सध्याचे मानधन 13.25 कोटी रुपये कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिल्लीत मोठे बदल होणार?

खेळाडूंबरोबरच सपोर्ट स्टाफमध्येही मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. माजी भारतीय कर्णधार Sourav Ganguly पुन्हा क्रिकेट संचालक म्हणून संघात परतू शकतात, तर युवराज सिंहची सपोर्ट स्टाफमध्ये एन्ट्री होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स 2027 हंगामासाठी पूर्णपणे नव्या रूपात दिसू शकते.मात्र, या सर्व घडामोडींवर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तरीही रिषभ पंतचे दिल्लीत पुनरागमन आणि कुलदीप यादवचा लखनऊकडे संभाव्य प्रवास हा आगामी आयपीएलमधील सर्वात मोठा ट्रेड ठरू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here