Mumbai : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सध्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू असून, त्यातील अंतिम सामना आज (२० मे) खेळला जात आहे. दुखापतींमुळे हार्दिक आणि विराट दोघेही अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडले होते आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्यांचे पुनरागमन अपेक्षित होते. मात्र, इंग्लंड मालिकेपूर्वी एक महत्त्वाची बातमी समोर आली असून, या दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला हा एक मोठा धक्का आहे.
https://prahaar.in/2026/06/20/there-is-only-one-shiv-sena-eknath-shindes/
स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. आयपीएल २०२६ दरम्यान मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याला ही दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे वृत्त आहे.अफगाणिस्तान मालिकेपूर्वी हार्दिक पांड्या बंगळुरूमधील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सराव करत होता, जिथे त्याच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या. वैद्यकीय पथकाने सुरुवातीला तो मालिकेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे सूचित केले होते.हार्दिकसोबतच विराटलाही (Virat Kholi) अफगाणिस्तान मालिकेमधून वगळण्यात आले होते. विराट कोहलीच्या इंग्लंडमधील पुनरागमनाबाबतचा निर्णय २६ जून रोजी घेतला जाईल. त्या दिवशी विराटची फिटनेस चाचणी होणार आहे. ज्यावरून तो इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सहभागी होऊ शकतो की नाही हे निश्चित केले जाईल.
https://prahaar.in/2026/06/20/eknath-shinde-takes-the-initiative-to-seek-justice-in-the-pawanraje-nimbalkar-murder-case/
हार्दिक पांड्याची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी
हार्दिक पंड्या याने आतापर्यंत ९४ एकदिवसीय (ODI) सामन्यांच्या ६८ डावांत ३२.८३ च्या सरासरीने आणि ११०.८९ च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने १,९०४ धावा केल्या आहेत, ज्यात ११ अर्धशतकांचा समावेश असून ९२ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने ९१ डावांत गोलंदाजी करताना ५.५१ च्या इकॉनॉमी रेटने आणि ३५.५० च्या सरासरीने एकूण ९१ बळी घेतले असून, २४ धावांत ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.