Home ब्रेकिंग न्यूज Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची राजकीय ताकद वाढणार, शिवसेनेच्या खासदारांची संख्या ७ वरून १३ वर पोहोचणार

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची राजकीय ताकद वाढणार, शिवसेनेच्या खासदारांची संख्या ७ वरून १३ वर पोहोचणार

0
Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची राजकीय ताकद वाढणार, शिवसेनेच्या खासदारांची संख्या ७ वरून १३ वर पोहोचणार
Eknath Shinde

मुंबई: लोकसभेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाच्या सहा खासदारांनी स्वतंत्र गटाची स्थापना केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची (Shiv Sena) लोकसभेतील ताकद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे(Uddhav Thackeray) गटाचे ९ खासदार (Member of Parliament) निवडून आले होते. त्यापैकी ६ खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून या गटाला लोकसभाध्यक्षांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे लोकसभेतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे.

उबाठातून स्वतंत्र झालेला गट लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत विलीन होणार असल्याचे वृत्त आहे. तसे झाले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची लोकसभेतील ताकद वाढणार आहे. सध्या शिवसेनेचे लोकसभेत सात खासदार आहेत. उबाठातून बाहेर पडलेला गट विलीन झाल्यास शिवसेनेची खासदार संख्या १३ वर पोहोचणार आहे.

https://prahaar.in/2026/06/19/south-africas-world-cup-hopes-kept-alive-match-against-the-czech-republic-ends-in-a-1-1-draw/

स्वतंत्र गट स्थापन करणाऱ्या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांचा समावेश आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाकडे लोकसभेत केवळ ३ खासदार उरले आहेत. अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे सध्या त्या गटाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

दरम्यान, हे ६ खासदार भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाल्यास पक्षाची लोकसभेतील संख्या ७ वरून थेट १३ पर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे राज्यातील आणि केंद्रातील राजकारणात शिंदे गटाची भूमिका अधिक मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

https://prahaar.in/2026/06/19/%e2%82%b9350-crore-for-the-gratuity-of-retired-best-employees/

सध्या शिवसेनेकडे डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde), नरेश म्हस्के (Naresh Mhaske), रवींद्र वायकर (Ravindra Waikar), प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav), श्रीरंग बारणे (Shrirang Barne), धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) आणि संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) हे ७ खासदार आहेत. त्यामध्ये आणखी ६ खासदारांची भर पडल्यास पक्षाला लोकसभेत अधिक प्रभावी उपस्थिती निर्माण करता येईल.

लोकसभेतील या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय (Maharashtra political) वातावरण पुन्हा एकदा तापले असून पुढील काळात या निर्णयाचे दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. विशेषतः शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकीय समीकरणांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here