केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांचा दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सहभाग
एमिरेट्स एनबीडी आणि आरबीएल बँकेतील भागीदारी कार्यक्रम
मुंबई, जगभरातील गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेतील विश्वास वाढत आहे. त्यामुळेच अरबी समुद्राच्या दोन्ही टोकांवरील मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या यूएई आणि भारत देशातील बँकांमध्ये बँकिंग भागीदारी होत आहे. ही बँकिंग भागीदारी भारतीय अर्थव्यवस्थेच्या उत्कर्षाचे प्रतीक असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
कुलाबा येथील हॉटेल ताज पॅलेस येथे यूएई देशातील एमिरेट्स एनबीडी (नॅशनल बँक ऑफ दुबई) आणि मुंबई स्थित असलेली आरबीएल (रत्नाकर बँक लिमिटेड) यांच्यामध्ये बँकिंग भागीदारीचा कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
https://prahaar.in/2026/06/18/telangana-t20-league-tcs-issues-legal-notice-to-mohammed-siraj-tilak-varma-and-rayudu/
केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सहभाग घेतला. आरबीएल बँकेचे संचालक चंदन सिन्हा, मुख्य कार्यकारी अधिकारी आर सुब्रमण्यमकुमार, केंद्रीय वित्त विभागाचे सचिव संजय लोहिया, एमिरेट्स एनबीडीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हिशाम अब्दुल्ला अल कासिम, बँक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेने नेल्सन आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारताची जगामध्ये सर्वात जास्त वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. या अर्थव्यवस्थेच्या वेगामध्ये महाराष्ट्राचाही सिंहाचा वाटा आहे. देशातील ४० टक्के परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येत आहे. महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीच्या अपार संधी आहेत. समृद्धी महामार्ग, मुंबईतील पायाभूत सुविधा विकास प्रकल्प, मजबूत दळणवळण सुविधा यामुळे राज्य हे देशाच्या ‘विकास गाथे’मध्ये अग्रणी आहे.
https://prahaar.in/2026/06/18/shreyanka-patil-major-blow-for-team-india-star-all-rounder-out-of-the-tournament/
महाराष्ट्रात सुरू झालेल्या आरबीएल बँकेने आपल्या कार्याचा विस्तार जागतिक स्तरावर केला आहे. बँकेची ही प्रगती देशाच्या मजबूत अर्थव्यवस्थेचे द्योतक आहे. त्यामुळेच आजची ही ऐतिहासिक भागीदारी भारताच्या विदेशी गुंतवणुकीचे सर्वात मोठे उदाहरण बनत आहे. हा कार्यक्रम केवळ कागदपत्रे हस्तांतरणाचा नाही, तर इतिहास निर्मितीचा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात यूएई आणि भारताचे संबंध अधिकाधिक दृढ होत आहे. ही आजची बँकिंग भागीदारी त्याचेच प्रतीक आहे. देश विदेशातील अनेक नामांकित बँक आज भारतीय बँकिंगसोबत भागीदारी करण्यास तयार आहे. यामुळे निश्चितच भारताची अर्थव्यवस्था अधिक विकसित होण्यासाठी मदत होणार आहे, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
आरबीएल बँक ही राज्यातील मोठा सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीचा भागीदार आहे. या निधीमधून ग्रामीण महाराष्ट्रसह सामाजिक जीवनाच्या परिवर्तनाचे कार्य होत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
एमिरेट्स एनबीडीचे उपाध्यक्ष हिशाम अब्दुल्ला अल कासिम म्हणाले की, या भागीदारीमुळे आणि भारतामधील व्यापार अधिक वृद्धिंगत होईल. भारतीय उद्योजक यूएईमध्ये येऊन गुंतवणूक करतील. या भागीदारीचा सकारात्मक प्रभाव दोन्ही देशातील बँकिंग व्यवस्थेवर पडणार आहे.
https://prahaar.in/2026/06/18/amit-shah-union-home-minister-amit-shah-on-a-two-day-visit-to-maharashtra/
एमिरेट्स एनबीडी चे मुख्य कार्यकारी अधिकारी शेन नेल्सन बँकेच्या कार्याचा मागोवा घेताना म्हणाले की, भारत हा जगातील सर्वात जलद गतीने विकास करणारी अर्थव्यवस्था आहे. येथील बाजारपेठ विस्तारणारी असून ग्राहकांची संख्या मोठी आहे. भारतातील बँकेच्या भागीदारीतून एमिरेट्स एनबीडी भारतात आपल्या कार्याचा विस्तार करणार आहे. भारतातील आर्थिक सेवा क्षेत्रात एमिरेट्स या भागीदारीतून अधिकाधिक उत्तम काम उभारेल.भारताच्या ग्रोथ स्टोरी मध्ये यूएई आपला निश्चितच या भागीदारीच्या माध्यमातून सहभाग देईल.
प्रास्ताविक आरबीएल बँकेचे कार्यकारी संचालक जयदीप अय्यर यांनी केले. त्यांनी दोन्ही बँकांच्या भागीदारी बद्दल माहिती दिली. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर सुब्रमण्यमकुमार यांनीही बँकेच्या कामगिरीचा आढाव घेत प्रकाश टाकला. एमिरेट्स एनबीडी बँकेकडून गुंतवणुकीचा धनादेश आरबीएल बँकेला सुपूर्द करण्यात आला. कार्यक्रमाला आरबीएल आणि एमिरेट्स एनबीडी बँकेचे अधिकारी उपस्थित होते.