मुंबई : गर्दीने व्यापलेल्या मुंबईच्या रस्त्यांवर दिवसरात्र एक तरूणी धावत असते. हातात फूड डिलिव्हरी बॅग आणि डोळ्यांत मोठं स्वप्न… दिवसभर कामाच्या निमित्ताने संघर्ष तर रात्री अभ्यासासाठीची धडपड असा दुहेरी प्रवास न थकता न कंटाळता करत असलेली २३ वर्षांची खुशबू सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. उत्तर प्रदेश पोलीस दलाची परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगत ती मुंबईत कष्टाने आयुष्य घडवत आहे.
https://prahaar.in/2026/06/17/big-news-regarding-the-railways-sunday-mega-block/
मुंबईत फूड डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करणाऱ्या २३ वर्षीय खुशबूची संघर्षमय आणि प्रेरणादायी कथा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्वीगी फूट मार्केटप्लेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कपूर यांनी तिचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तिच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
https://prahaar.in/2026/06/17/railway-polices-unique-yamdoot-campaign-at-diva-station/
मूळची गाझीपूरची खुशबू सध्या मुंबईत स्विगीसाठी फूड डिलिव्हरीची नोकरी करत आहे. तिला चार भावंडे आहेत. या सर्वांना चांगले आयुष्य जगता यावे यासाठी ती कुटुंबाला न सांगता मुंबई सारख्या शहरात आली. स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी तिने फूड डिलिव्हरीचे काम सुरू केले. दिवसा ती मुंबईच्या रस्त्यांवर फूड डिलिव्हरी करते,तर रात्री यूपी पोलीस भरती परीक्षेची तयारी करते. पोलीस अधिकारी झाल्यावर गावी जायचे असे स्वप्न खुशबूने उराशी बाळगले आहे.
https://prahaar.in/2026/06/17/bse-launch-indias-first-satvik-index-for-values-based-investing-launched/
स्वीगीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कपूर यांनी व्हिडीओ शेअर करत खुशबूच्या कष्टांचे आणि संघर्षाचे कौतुक केले. तिच्या ध्येयात सुस्पष्टता दिसते. तिच्या या प्रयत्नांतून अनेकांना प्रेरणा मिळू शकते असा विश्वास रोहित यांनी व्यक्त केला.
https://prahaar.in/2026/06/17/el-nino-threat-of-water-scarcity-looms-due-to-el-ninos-impact-dam-storage-levels-have-dropped-and-government-machinery-is-on-alert/
भारतीय गावांनी अनेक दशकांपासून लोकांना शहरांकडे जाताना पाहिले आहे.खुशबू देखील गेली,पण मुंबईतून परत जायचे आहे म्हणून ती मुंबईत आली आहे. बहुतेक जण मुंबईत येतात आणि पुन्हा कधीही परत जाऊ इच्छित नाहीत. पण खुशबू अशी आली आहे की ती परत जाईल आणि मोठी कौतुकास्पद कामगिरी करुनच जाईल, असे रोहित यांनी व्हिडीओ शेअर करताना नमूद केले आहे.
रोहित यांनी शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेकांनी खुशबूच्या मेहनतीचे कौतुक केले आहे तर काहींनी अशा कर्मचाऱ्यांसाठी कंपन्यांनी अधिक शैक्षणिक मदत व प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. खुशबूची ही कहाणी तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे.