आडूळ (ता. पैठण): धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडूळ फाटा येथे बुधवारी (दि. १७) दुपारी भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पार्थ अर्जुन गिरी (वय १९, रा. खादगाव) हा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
https://prahaar.in/2026/06/17/nitesh-rane-on-maritime-policy-2026-prepared/
नेमकी घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ गिरी हा आपल्या दुचाकीने (एमएच २० बीएम ५४३४) पांढरीकडून आडूळच्या दिशेने जात होता. दरम्यान, आडूळ फाट्याजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (एमएच २१ बीव्ही ८२५६) त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकी सुमारे १० ते १५ फूट हवेत उडून रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळली. त्यानंतर कारवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्यालगतच्या मोसंबीच्या बागेत शिरून थेट एका झाडावर जाऊन धडकली.
https://prahaar.in/2026/06/17/water-supply-will-remain-shut-on-this-day-of-the-week-in-june-july/
कारमधील संशयित पसार
अपघातानंतर कारमधील सर्वजण घटनास्थळावरून तातडीने पसार झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ मोठी खळबळ उडाली होती. अपघाताची माहिती मिळताच आडूळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ‘१०२’ रुग्णवाहिकेचे चालक विजय भालेराव यांनी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी पार्थला तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला हलवले.
https://prahaar.in/2026/06/17/chandrashekar-bawankule-bjp-has-no-connection-to-operation-tiger/
पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार रंजितसिंग दुल्हत पुढील तपास करत आहेत. भरधाव वाहनांमुळे महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढत असून, वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन पुन्हा एकदा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.