Nashik : नाशिक शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने अवैध शस्त्रांविरोधात कारवाई करत एका युवकाला गावठी कट्टा आणि जिवंत काडतूसासह अटक केली. ही कारवाई १६ जून २०२६ रोजी नांदूर नाका परिसरात करण्यात आली.
https://prahaar.in/2026/06/17/nashik-vidhan-parishad-election/
गुंडा विरोधी पथकातील पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना एका इसमाकडे गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने नांदूर नाका परिसरात सापळा रचला. हॉटेल राजगड येथील पार्किंगमध्ये संशयित हालचाली करणाऱ्या युवकाला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.अटक करण्यात आलेल्या संशयिताची ओळख सचिन सिद्धेश्वर वणवे (वय २८, रा. ड्रीम रेसिडेन्सी, विद्यानगरी, जेलरोड, नाशिक) अशी झाली.
https://prahaar.in/2026/06/17/water-levels-in-nashiks-dams-at-a-worrying-stage/
याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील गंभीर गुन्हेगार, पाहिजे आरोपी आणि अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथक सातत्याने विशेष मोहिमा राबवत आहे. सदर कारवाईत पथकाचे प्रभारी अधिकारी संदीप पवार यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला.