Home ब्रेकिंग न्यूज Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; उद्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवे २ तासांचा मेगा ब्लॉक; जाणून घ्या वाहतुकीतले बदल

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; उद्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवे २ तासांचा मेगा ब्लॉक; जाणून घ्या वाहतुकीतले बदल

0
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; उद्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवे २ तासांचा मेगा ब्लॉक; जाणून घ्या वाहतुकीतले बदल
mumbai - pune expressway

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून (Mumbai-Pune Expressway) गुरुवारी (१८ जून) प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळील धोकादायक दगड हटवण्यासाठी दुपारी १२ ते २ या वेळेत एक्सप्रेसवेवर दोन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत जड आणि अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असून हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.

दगडामुळे निर्माण झाला धोका :

खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याच्या वरच्या भागातून एक मोठा दगड निखळून खाली आला आहे. सुदैवाने हा दगड दरड संरक्षणासाठी बसवलेल्या लोखंडी जाळीत अडकला आहे. मात्र तो कधीही कोसळू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा दगड हटवण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. (Mumbai-Pune Expressway)

https://prahaar.in/2026/06/17/vijay-singhal-vijay-singhal-appointed-as-special-officer-for-dharavi-redevelopment/

पुणे-मुंबई मार्गावरील वाहतुकीत बदल :

पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या जड व अवजड वाहनांना लोणावळ्याजवळील औंढे पुलाजवळ (किमी ५९) सर्व्हिस रोडवर थांबवण्यात येणार आहे. तर कार आणि इतर हलकी वाहने मिसिंग लिंक मार्गाचा वापर करून मुंबईकडे मार्गस्थ होतील. (Mumbai-Pune Expressway)

मुंबई-पुणे मार्गावरील वाहतुकीची व्यवस्था :

मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या जड वाहनांना खालापूर टोलनाक्याजवळील चौक फाटा येथे रोखण्यात येणार आहे. हलकी वाहने खोपोली एक्झिटजवळील किमी ३९ कनेक्टिंग लिंकमार्गे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळवण्यात येतील. (Mumbai-Pune Expressway)

https://prahaar.in/2026/06/17/bmc-app-road-issue-can-be-done-on-app/

प्रशासनाचे आवाहन :

महामार्गाचे अप्पर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे यांनी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून, ब्लॉकच्या कालावधीत वाहनचालकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शक्य असल्यास दुपारी १२ ते २ या वेळेत एक्सप्रेसवेवरील प्रवास टाळावा, असा सल्लाही देण्यात आला आहे. प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी वाहतूक बदलांची माहिती तपासूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Mumbai-Pune Expressway)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here